शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेला २०० कोटींचा खास निधी द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:51 IST

सांगली : महाराष्ट्र शासनाच्या यंदाच्या अर्थसंकल्पात सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेसाठी खास निधी म्हणून २०० कोटींचा निधी मंजूर करावा, अशी ...

सांगली : महाराष्ट्र शासनाच्या यंदाच्या अर्थसंकल्पात सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेसाठी खास निधी म्हणून २०० कोटींचा निधी मंजूर करावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष व 'व्हिजन सांगली' फोरमचे मुख्य समन्वयक सुरेश पाटील यांनी जयंत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सुरेश पाटील यांनी सांगितले की, नुकतीच महापौर निवडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाने एकत्रित येत भाजपच्या महापालिकेतील सत्तेला सुरूंग लावत जयंत पाटील यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली मोठया दिमाखात सत्ता काबीज केली. येणाऱ्या अडीच वर्षामध्ये राज्य शासनाच्या सहकार्याने महापालिका क्षेत्राचा पूर्ण विकास करणे गरजेचे आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या यंदाच्या बजेटमध्ये महापालिकेसाठी खास निधी म्हणून २०० कोटींचा निधी मंजूर करून देण्यात यावा.

भारतीय जनता पक्षाची राज्यात सत्ता असताना मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगली महानगरपालिकेची सत्ता बीजेपीकडे आल्यानंतर १०० कोटी रुपयांचा निधी महापालिकेस बक्षीस स्वरूपात दिला होता. या सत्ताबदलाचे फळ म्हणून यंदाच्या बजेटमध्ये या महापालिकेसाठी किमान २०० कोटींचा निधी बक्षीस स्वरूपात देण्यासाठी तरतूद केल्यास, पुढच्या दोन वर्षांमध्ये प्रलंबित व नवीन कामे पूर्ण करता येतील. प्रस्तावित कामांमध्ये शेरीनाला, ड्रेनेज, शहरातील गुंठेवारी भागातील रस्ते, नवीन डांबरी रस्ते, तसेच नवीन डीपी प्लॅन, रस्ते, कुपवाड शहरातील हॉस्पिटल, उद्यान, तसेच खुल्या ओपन स्पेस असणाऱ्या जागांना तारेचे कंपाऊंड,

छोटी उद्याने, काळी खण, नवीन प्रस्तावित उद्याने, स्पोर्टस कॉम्प्लेक्स, ट्रक टर्मिनस, सुसज्ज नाटयगृह, वॉर्डनिहाय व्यायामशाळा, ग्रंथालय अशी अनेक कामे करता येतील. त्याचा दोन वर्षाचा मास्टर प्लॅ॑न जर आपण बनवून त्याप्रमाणे कार्य केले, तर संपूर्ण कामे पूर्णत्वास जाणे शक्‍य होईल. यासाठी महापालिकेस हा निधी मंजूर करून द्यावा.