शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

लिंबखिंडीत विचित्र अपघातात २० जखमी

By admin | Updated: January 14, 2015 00:31 IST

अपघातातील बहुतांश जखमी सांगली जिल्ह्यातील

किडगाव : पुणे-बंगलोर महामार्गावर लिंंबखिंंड, ता. सातारा येथे मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास झालेल्या तीन वाहनांच्या विचित्र अपघातात वीस जखमी झाले. दरम्यान, या अपघातानंतर येथे वाहतुकीची कोंडी झाली होती. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास लिंंबखिंंड येथील चढावर रस्त्यावर असणाऱ्या जेसीबीला एसटी व बोलेरो गाडीची धडक बसली. यामध्ये बोलेरो व एसटी बसमधील वीस प्रवासी जखमी झाले. यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे.या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. महामार्ग मदत केंद्राच्या रुग्णवाहिकाही तत्काळ रवाना झाल्या. त्यातून जखमींना तातडीने उपचारासाठी सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, लिंबखिंड येथे झालेला अपघात मोठा असून, जखमींना जिल्हा रुग्णालयात आणले जाणार असल्याची माहिती मिळताच सातारा उपविभागाचे पोलीस उपधीक्षक डॉ. संदीप पखाले, शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजीव मुठाणे दाखल झाले. त्यांनी येथे जखमींच्या उपचारासाठी यंत्रणा तत्काळ उपलब्ध करून दिली.दरम्यान, अपघातानंतर दोन्ही वाहने रस्त्यातच अडकून पडल्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली. यानंतर पोलिसांनी क्रेनच्या साह्याने गाड्या बाजूला घेऊन वाहतूक पूर्ववत केली. दोन्ही वाहनांचे चालक जेसीबीला धडक बसल्याचे सांगत होते. मात्र, घटनास्थळी जेसीबी आढळून आला नाही. अपघातातील जखमींची नावे घेण्याची व गुन्हा नोंदविण्याची करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सातारा तालुका पोलीस ठाण्यात सुरू होती. (प्रतिनिधी)अपघातातील बहुतांश जखमी सांगली जिल्ह्यातीलविटा आगाराची विटा-पिंपरी-चिंचवड या बस (एमएच १४ - बीटी २९४१) मधील वीस प्रवासी जखमी झाले. यामध्ये उमेश रामचंद्र जाधव (वय ३८, रा. आटपाडी, जि. सांगली), अमर अशोक दोडके (वय ३३, रा. हणमंतनगर, विटा) हे गंभीर जखमी झाले. मनोहर बाबुराव पवार (वय ७२, रा. वडूज, जि. सातारा), लक्ष्मी चंद्रकांत लोंंढे (वय ४५, रा. खडकी, पुणे), समीर संतोष भोसले (वय २९, रा. भुर्इंज, ता. वाई), अंकुशराव चंद्रकांत जाधव (वय २९, रा. चिंचोली, ता. शिराळा, जि. सांगली), नीलेश जाधव (वय ३४, रा. उल्हासनगर) विनोद देशमुख (वय २९, रा. अंबरनाथ पूर्व), शरद विठोबा पवार (वय ३३, रा. तडसर, वांगी, ता. कडेगाव), भगवान दाजी पवार (वय १२, भारतीनगर, पुणे), इकबाल शब्बीर मोमीन (वय २४, रा. डोळेगाव, ता. सातारा), संभाजी नरसिंह गाडे (वय ३४, रा. साधलापूर, जि. परभणी), विजय विठ्ठल राठोड (वय ३९, येरवडा, पुणे) यांचा समावेश आहे. काही जखमींची नावे मिळू शकली नाहीत.चारचाकीतून (एमएच १२ - ११७७) प्रवास करणारे नाना मारुती गावडे (वय २८, रा. येरवडा, पुणे) आणि दत्तात्रय बापूसाहेब राणे (वय ४२) हे अपघातात जखमी झाले.वाईतही विचित्र अपघात; एक ठारवाई : वाई येथील औद्योगिक वसाहतीजवळ असलेल्या चांदणी चौकात मंगळवार, दि. १३ रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास झालेल्या विचित्र अपघातात सदाशिव दगडू शिंदे यांचा मृत्यू झाला. बंद जीप चालू करत असताना अचानक गाडी सुरू झाल्याने ते जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.वाई पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, सदाशिव दगडू शिंदे (वय ५२, रा़ सोनगांव ता. सातारा) याचा जीप (एमटीएस ६६६८) वाई येथील औद्योगिक वसाहतीतील चांदणी चौकात आला असता बंद पडला. सदाशिव शिंदे हे गाडी चालू होत नसल्याने गाडीचे बॉनेट उघडून थेट पान्ह्याच्या साह्याने गाडी सुरू करण्याचा प्रयत्न करत होते. त्याच वेळी अचानक गाडी सुरू झाली. त्यावेळी गाडी गिअरमध्ये असल्याने चालू झालेल्या गाडीचा जोरदार धक्का बसला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची वाई पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. सहायक पोलीस निरीक्षक पी़ एऩ खरात तपास करीत आहेत़ (प्रतिनिधी)