शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

जिल्ह्यात १९ तळीरामांना अटक

By admin | Updated: May 26, 2014 01:18 IST

जिल्हाभर नाकाबंदी : पोलिसांची पुन्हा मोहीम सुरू; मद्यपींची वाहने जप्त

सांगली : दारुच्या नशेत वाहन चालविणार्‍या तळीरामांची शनिवारी रात्री पुन्हा धरपकड करण्यात आली. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यात १९ जणांना अटक करण्यात आली. त्यांची वाहने जप्त करण्यात आली आहेत. रात्री दहा ते बारा या वेळेत ही मोहीम राबविली. अटक केलेल्यांमध्ये सचिन बाबासाहेब शिरतोडे (वय ३२, रा. कवठेएकंद, ता. तासगाव), अशोक जगन्नाथ कावरे (५२, पलूस), जीवन विठ्ठल गडदे (३०, कुंडल), संदीप सखाराम पाखरे (२८, रामानंदनगर, ता. पलूस), तात्यासाहेब गणपती बिळासकर (३०, रा. बिऊर, ता. शिराळा), प्रमोद मुकुंद पटवर्धन (रा. टिंबर एरिया, सांगली), वामन भानुदास लवटे (अहिल्यादेवी होळकर चौक, सांगली), नेताजी भीमराव केंगार (२६, जाखापूर, ता. कवठेमहांकाळ), भरत आनंदा मोरे (४३, रा. कृष्णाघाट, सांगली), विजय भाऊसाहेब लांडे (४०, रा. मौजे डिग्रज, ता. मिरज), बाळासाहेब मुरा पडळकर (३७, रा. वारणाली, विश्रामबाग), सिद्धाप्पा गुराप्पा बिरादार (३८, संजयनगर, सांगली), नामदेव मल्हारी कोकणे (६५, भारत सूतगिरणीजवळ, सांगली), दयानंद लिंगाप्पा ढवळेश्वर (४८, कुपवाड), प्रकाश रावसाहेब बंडोरे (३०, उदनवाडी, ता. सांगोला), विद्याधर वसंत फणबट (४५, रा. विवेकानंद सोसायटी, कुपवाड), अतुल आनंदराव दळवी (२७, रा. मंगसुळी, ता. अथणी), शफिक मालेकर (३०, बागणी), लालासाहेब पांडुरंग कदम (रा. आष्टा, ता. वाळवा) यांचा समावेश आहे. जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी शनिवारी रात्री संपूर्ण जिल्हाभर नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी व दारुच्या नशेत वाहन चालविणार्‍या तळीरामांची धरपकड करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्ह्यातील २२ पोलीस ठाणे हद्दीत नाकाबंदी लावली होती. सांगली शहर, विश्रामबाग, वाहतूक नियंत्रण शाखा, तासगाव, आष्टा, शिराळा, कवठेमहांकाळ, कुंडल या पोलिसांनाच तळीराम सापडले. अन्य पोलीस ठाण्यांच्या पोलिसांची मात्र एकही कारवाई न केल्याने सावंत यांनी नाराजी व्यक्त केली. (प्रतिनिधी) अब्दुलकरीम खाँ संगीत सभेस प्रारंभ मिरजेत आयोजन : दिग्गज कलाकारांच्या आविष्काराने श्रोते मंत्रमुग्ध मिरज : मिरजेत दर्गा उरूसानिमित्त संगीतरत्न अब्दुलकरीम खाँ संगीत सभेस आज सकाळी सुरुवात झाली. किराना घराण्याच्या दिग्गजांनी सादर केलेल्या गायन व वादनाने श्रोते मंत्रमुग्ध झाले. सकाळी दहा वाजता मीरासाहेब दर्गा पटांगणातील चिंचेच्या झाडाखाली संगीत सभेस सुरुवात झाली. संगीत सभेत डोंबीवलीचे समीर अभ्यंकर, पुणे येथील पंडित संजीव जहागीरदार, मुंबईचे पंडित चंद्रशेखर वझे, कोल्हापूरचे पंडित किशोर कागलकर व पंडित सहदेव झेंडे यांचे गायन व पुणे येथील चंद्रशेखर गाडगीळ यांचे गझल गायन झाले. समीर अभ्यंकर यांनी कोमल रिषभ आसावरी हा राग आळविला. विलंबित एकतालात री मे सुन पिया की बात व त्रितालात बढैय्या लावो लावो रे लावो या रचना सादर केल्या. त्यांना अजित पुरोहित यांनी हार्मोनियम व जितेंद्र भोसले यांनी तबलासाथ केली. पंडित संजीव जहागीरदार यांनी राग आसावरी तोडी सादर केला. विलंबित एकतालात सब मेरा वोही सकल जगत को पैदा करे व त्रितालात मै तो तुम्हारा दास या रचना सादर केल्या. त्यांना कल्याण देशपांडे यांनी तबला व अजित पुरोहित यांनी हार्मोनियमसाथ केली. पंडित चंद्रशेखर वझे यांनी राग भटियार सादर केला. विलंबित एकतालात महादेव शिवशंकर व द्रुत त्रितालात बेचैन हुई तेरे कारण या रचना सादर केल्या. त्यांना मनमोहन कुंभारे यांनी तबला व मधुकर कदम यांनी हार्मोनियमसाथ केली. पंडित किशोर कागलकर यांनी विलंबित एकतालात निले घुंगरीया हा राग बिलास खानी तोडी व द्रुत त्रितालात बलमा मोरी छोडी कलाईया हे राग सादर केले. त्यांना संदीप तावरे यांनी हार्मोनियम व दादा मुळे यांनी तबलासाथ केली. पंडित चंद्रशेखर गाडगीळ यांच्या वक्तसे पहले या गझल गायनाने श्रोते मंत्रमुग्ध झाले. पंडित सहदेव झेंडे यांनी सूर मल्हार हा राग आळविला. पिलवित एकतालात गरजत आये व द्रुत त्रितालात बदलवा बरसन लागी सादर केले. त्यांच्या गायनाने मैफिलीचा समारोप झाला. (वार्ताहर)