सांगली : जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात १९ नवे कोरोना रुग्ण आढळले, तर १९ जणांनी कोरोनावर मात केली. उपचाराखालील एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ५० जणांची प्रकृती चिंताजनक असून, उपचाराखाली रुग्णाची संख्या दोनशेवर गेली आहे.
महापालिका क्षेत्रात मंगळवारी सांगलीत १, तर मिरजेत एका रुग्णांची नोंद झाली. आटपाडी, खानापूर तालुक्यात प्रत्येकी ४, तासगाव तालुक्यात ५, जतमध्ये दोन, तर कडेगाव व पलूस तालुक्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला. मिरज, वाळवा, शिराळा व कवठेमहांकाळ तालुक्यात एकही रुग्ण आढळला नाही. मिरज तालुक्यातील एका रुग्णांचा मृत्यू झाला.
दिवसभरात आरटीपीसीआरच्या २३९ चाचण्या करण्यात आल्या. त्यात तीन पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आले. अँटिजेनच्या ८९० चाचण्यांत १८ रुग्ण सापडले. सध्या ५० जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यात ऑक्सिजनवर ३४, हाय फ्लो नेझल ऑक्सिजनवर ४, तर नाॅन इन्व्हेजिव व्हेंटिलेटरवर १२ रुग्ण आहेत. कर्नाटक व सोलापूर येथील प्रत्येकी एक रुग्ण उपचारासाठी जिल्ह्यात दाखल झाला आहे. सध्या परजिल्ह्यांतील १२ रुग्ण उपचाराखाली आहेत.
चौकट
मंगळवारी दिवसभरात...
आजचे रुग्ण : १९
उपचाराखालील रुग्ण : २१४
आजअखेर बरे झालेले रुग्ण : ४५,८८२
मृत्यू : १७३८
आजअखेरचे एकूण रुग्ण : ४७,८३४
चिंताजनक : ५०
चौकट
रुग्णसंख्या अशी
सांगली : १
मिरज : १
आटपाडी : ४
कडेगाव : १
खानापूर : ४
पलूस : १
तासगाव : ५
जत : २
कवठेमहाकांळ : ०
मिरज : ०
शिराळा : ०
वाळवा : ०