शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

कर्जमाफी, सवलतीसाठी १.९0 लाख अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 00:38 IST

सांगली : कर्जमाफी, सवलतीसाठी ४ सप्टेंबरअखेर जिल्ह्यातील १ लाख ९0 हजार अर्जांची नोंदणी झाली असून, यापैकी १ लाख ७0 हजार अर्जांच्या संगणकीय नोंदीचे काम पूर्ण झाले आहे.

ठळक मुद्देजिल्हा बँकेच्या शाखेतील ही यंत्रणा वापरण्यास हरकत नाही, असे बँकेने स्पष्ट केलेअनुदानासाठी जिल्ह्यातील सुमारे २ लाख ५७ हजार शेतकरी पात्र टरनेट कनेक्शन मिळत नसल्याने नोंदणी गतीने करणे अशक्य

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : कर्जमाफी, सवलतीसाठी ४ सप्टेंबरअखेर जिल्ह्यातील १ लाख ९0 हजार अर्जांची नोंदणी झाली असून, यापैकी १ लाख ७0 हजार अर्जांच्या संगणकीय नोंदीचे काम पूर्ण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून मंदगतीने चालणाºया आॅनलाईन नोंदणी प्रक्रियेने आता गती घेतली असून, दिवसभरात १२ हजारांवर अर्जांची नोंदणी होऊ लागली आहे.

थकबाकीदार शेतकºयांसाठी कर्जमाफी व नियमित कर्जदारांना अनुदान योजना जाहीर होऊन आता दोन महिने पूर्ण झाले आहेत. राज्य शासनाच्या कर्जमाफी, प्रोत्साहनपर अनुदानासाठी जिल्ह्यातील सुमारे २ लाख ५७ हजार शेतकरी पात्र आहेत. कर्जमाफीचा अर्ज आॅनलाईन भरायचा आहे. त्यामुळे अर्ज भरण्याची सोय सेतू केंद्रात करण्यात आली आहे. परंतु ग्रामीण भागात अनेक ठिकाणी इंटरनेट सुविधेच्या अडचणी आहेत. पूर्ण क्षमतेने इंटरनेट कनेक्शन मिळत नसल्याने नोंदणी गतीने करणे अशक्य होत आहे. अनेक शेतकºयांचे आधार कार्ड जोडले जात नाही. या कारणांनी अर्ज नोंदणीस वेळ लागत असल्याचे स्पष्ट झाले. जिल्ह्यात ४ सप्टेंबरअखेर १ लाख ९० हजार शेतकºयांचे अर्ज दाखल झाले असून, यापैकी १ लाख ७० हजार अर्ज संगणकावर अपलोड झाले आहेत.

संगणकीय नोंदीची गती गेल्या चार दिवसांपासून वाढली असून दिवसभरात १२ हजारावर अर्जांची नोंदणी होत आहे. हीच गती राहिली, तर १५ सप्टेंबरपर्यंत शंभर टक्के नोंदणी पूर्ण होऊ शकते. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. आॅनलाईन अर्ज भरण्याचे काम गतीने होण्यासाठी जिल्हा बँकेच्या २१८ शाखांपैकी १०० शाखांत बायोमेट्रिक यंत्रे देण्यात आली आहेत. गरज पडल्यास आणखी यंत्रे मागविण्यात येतील. ज्या गावातील सोसायट्यांमध्ये संगणक, इंटरनेटबाबत अडचणी आहेत, त्यांनी जिल्हा बँकेच्या शाखेतील ही यंत्रणा वापरण्यास हरकत नाही, असे बँकेने स्पष्ट केले आहे.अन्य शहरातूनही अर्जमुंबई, पुणे व अन्य शहरातूनही सांगली जिल्ह्यातील शेतकरी व त्यांच्या कुटुंबियांनी अर्ज दाखल केल्याचे दिसत आहे. अशा अर्जांचीही गोळाबेरीच आता करावी लागणार आहे.