शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘फिट इंडिया’त सांगली जिल्ह्यातील १८९६ शाळा ‘अनफिट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:19 IST

सांगली : कोरोना काळात सर्वांच्याच शारीरिक क्षमतेचा कस लागला. प्रतिकार क्षमतेअभावी अनेकांचा कोरोनाने बळी घेतला. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ...

सांगली : कोरोना काळात सर्वांच्याच शारीरिक क्षमतेचा कस लागला. प्रतिकार क्षमतेअभावी अनेकांचा कोरोनाने बळी घेतला. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने फिट इंडिया मोहीम सुरू केली आहे. जिल्ह्यातून तिला मिळालेला प्रतिसाद मात्र अत्यंत निराशाजनक आहे. सुमारे २२२७ शाळांपैकी फक्त ३३१ शाळांनीच सहभाग नोंदविला आहे. खेळांकडे पाहण्याचा समाजाचा आणि शाळांचा दृष्टिकोन अत्यंत उदासीन असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.

जिल्ह्यात पहिली ते बारावीच्या २ हजार २२७ शाळा आहेत. सर्वच शाळांनी फिट इंडियामध्ये सहभाग घेणे अपेक्षित आहे. प्रत्यक्ष परिस्थिती मात्र तशी नाही. फेब्रुवारीमध्ये मोहीम सुरू झाल्यानंतर क्रीडा व शिक्षण विभागाने तालुकानिहाय क्रीडाशिक्षकांच्या बैठका घेतल्या. योजनेची माहिती देऊन नोंदणीचे आवाहन केले. शिराळा, वाळवा आणि मिरज तालुक्यांनी त्यात रस दाखविला. मिरजेतून १०२, वाळव्यातून १२० आणि शिराळ्यातून १०९ शाळांनी नोंदणी केली. उर्वरित तालुक्यांतून मात्र अत्यल्प प्रतिसाद आहे. नोंदणीची मुदत २७ डिसेंबरपर्यंत आहे; पण तिला आणखी मुदतवाढीची शक्यता क्रीडा क्षेत्रातून व्यक्त करण्यात आली.

संपूर्ण नोंदणी ऑनलाईन स्वरुपात करायची आहे. त्यासाठी प्रत्येक शाळेला लिंक देण्यात आली आहे. लॉकडाऊन काळात नोंदणी सुरू झाली. नेमक्या याच काळात शाळा बंद होत्या. विद्यार्थी व क्रीडा शिक्षकांचा संपर्कच राहिला नाही. त्याचाही फटका फिड इंडियाला बसला. मुळात या उपक्रमाची सुरुवातच चुकीच्या वेळी झाल्याची प्रतिक्रिया क्रीडाशिक्षकांनी व्यक्त केली. शाळांमध्ये खेळांविषयी अत्यंत अनास्था असल्याचे फिट इंडिया मोहिमेमुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. क्रीडा साहित्य वर्षानुवर्षे धूळ खात पडते. ते मुलांपर्यंत येतच नाही. सहायक शिक्षकच क्रीडाशिक्षक असतो. त्याला खेळ सोडून शाळेतील अन्य सर्व कामे लावली जातात. मूळ विषय बाजूलाच राहतो.

कोरोनामुळे शाळा बंद राहिल्या. त्याचा फटका फिट इंडियाच्या नोंदणीला बसला. शाळा व मुलांशी संपर्कच झाला नाही. योजनेचा प्रसारही परिणामकारक होऊ शकला नाही. आता शाळा सुरू होत असल्याने नोंदणी वाढण्याची अपेक्षा आहे. तंदुुरुस्त देशासाठी मोहीम महत्त्वाची आहे.

- प्रशांत पवार,

प्रशिक्षक

कोरोनामुळे शाळा बंद राहिल्या. त्याचा फटका फिट इंडियाच्या नोंदणीला बसला. शाळा व मुलांशी संपर्कच झाला नाही. योजनेचा प्रसारही परिणामकारक होऊ शकला नाही. आता शाळा सुरू होत असल्याने नोंदणी वाढण्याची अपेक्षा आहे. तंदुुरुस्त देशासाठी मोहीम महत्त्वाची आहे.

- प्रशांत पवार,

प्रशिक्षक

कोरोना लॉकडाऊन काळात फिट इंडियासाठी पूर्ण नोंदणी शक्य झाली नाही. तीन तालुक्यांतून क्रीडाशिक्षकांच्या कार्यशाळा घेऊन नोंदणीसाठी आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद मिळाला. अजूनही नोंदणी सुरू आहे. जास्तीजास्त शाळांच्या सहभागासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.

- माणिक वाघमारे,

जिल्हा क्रीडा अधिकारी.

-------