शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

कृषी पंप वीज जोडणीसाठी १८७ कोटींच्या निविदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 23:57 IST

सांगली : महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार यापुढे कृषी पंपाचे कनेक्शन आता उच्चदाब वीज वितरण कंपनीद्वारेच दिले जाणार आहे. याची निविदा प्रक्रिया देखील सुरू झाली असून सांगली जिल्ह्यातील १३ हजार ४८७ कृषिपंप धारकांसाठी १८७ कोटी ९५ लाखांची निविदा मागविल्या असल्याचे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. शेतकºयांच्या गरजेनुसार दहा ते पंचवीस केव्हीए क्षमतेच्या छोट्या ...

सांगली : महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार यापुढे कृषी पंपाचे कनेक्शन आता उच्चदाब वीज वितरण कंपनीद्वारेच दिले जाणार आहे. याची निविदा प्रक्रिया देखील सुरू झाली असून सांगली जिल्ह्यातील १३ हजार ४८७ कृषिपंप धारकांसाठी १८७ कोटी ९५ लाखांची निविदा मागविल्या असल्याचे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. शेतकºयांच्या गरजेनुसार दहा ते पंचवीस केव्हीए क्षमतेच्या छोट्या थ्री फेज वितरण रोहित्राद्वारे वीज जोडणी मिळणार आहे. एका रोहित्रावर फक्त एक किंवा दोन कृषिपंप असणार आहेत.प्रचलित पध्दतीनुसार शेतीला ६३ व १०० केव्हीए क्षमतेच्या रोहित्रावरुन वीजपुरवठा होतो. एका रोहित्रावर १५ ते २० शेतीपंपांना वीजपुरवठा केला जात असल्याने कमी दाबाने वीजपुरवठा होणे, बिघाड होऊन वीजपुरवठा खंडित होणे, रोहित्र जळणे तसेच तांत्रिक गळती वाढणे अशा समस्यांना तोंड द्यावे लागते. यावर उपाय म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्रासाठी उच्च्दाब वितरण प्रणाली राबविण्याचे धोरण आखले आहे.शेतकºयांच्या विहिरीपर्यंत उच्च दाबाची वाहिनी उभारुन वीज जोडणी दिली जाणार आहे. ७.५ अश्वशक्ती जोडभारासाठी दहा केव्हीएचे, दहा अश्वशक्तीसाठी १६, तर त्याहून अधिक भार किंवा शेजारी दुसरे शेतकरी असल्यास २५ केव्हीए क्षमतेचे थ्री फेज रोहित्र खांबावरच बसविले जाणार आहे. त्याच खांबावर रोहित्राच्या खाली मीटरपेटी बसवून जोडणी दिली जाणार आहे.सांगली जिल्ह्यातील १३ हजार ४८७ प्रलंबित कृषिपंप जोडण्यांसाठी १८७ कोटी ९५ लाखाच्या निविदा मागविल्या आहेत. निविदा प्रक्रिया पूर्ण होताच संपूर्ण जोडण्या उच्चदाब वितरण प्रणालीतूनच मिळणार आहेत.नवीन प्रणालीचे फायदेलघुदाब वाहिनीचे जाळे नसल्यामुळे बिघाडाचे प्रमाणात कमी होऊन अखंडित व शाश्वत वीजपुरवठा मिळणार आहे.उच्चदाब वाहिनी उपकेंद्रातून सर्किट ब्रेकरद्वारे नियंत्रित होत असल्याने विजेची तार तुटल्यास वीजपुरवठा उपकेंद्रातून त्याक्षणास बंद होऊन वीज वाहिनी तुटून होणाºया अपघातात घट होईल.उच्चदाब वाहिनीवर आकडे टाकून वीजचोरी होण्याचा धोका नाही. लघुदाब वाहिनी नसल्याने योग्य दाबाने वीजपुरवठा.प्रत्येक रोहित्रावर एक किंवा दोन शेतकरी असल्यामुळे शेतकºयांमध्ये रोहित्र स्वामित्वाची भावना निर्माण होईल. त्यामुळे या रोहित्रावरुन अनधिकृत वीज जोडणी होणार नाही. तसेच रोहित्र जळण्याच्या प्रमाणातही घट होईल.