शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

म्हैसाळजवळ १७ लाखाचा गुटखा, सुगंधी तंबाखू साठा जप्त; सांगलीतील एकास अटक

By घनशाम नवाथे | Updated: April 10, 2024 20:22 IST

स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई, संशयित मगदूम याच्यावर मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सांगली : म्हैसाळ ते मिरज रस्त्यावर सुगंधी तंबाखू, गुटखा तस्करी करणाऱी पिकअप स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने पकडून १७ लाख ३० हजाराचा माल जप्त केला. पिकअपसह २५ लाख ८० हजाराचा मुद्देमाल जप्त करून मधुसुदन महेश मगदूम (वय २२, रा. हसनी आश्रम नजीक, श्रीरामनगर, विजयनगर सांगली ) याला अटक केली. याबाबत मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

अधिक माहिती अशी, स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पोलिस पथकाला म्हैसाळ ते मिरज रस्त्यावरुन एका पिकअपमधून शासनाने प्रतिबंधित केलेली सुगंधी तंबाखू आणि गुटखा यांनी चोरुन विक्री करण्यासाठी वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी परिसरात सापळा लावला होता. सायंकाळी ५ च्या सुमारास पिकअप (एमएच ०८ एपी ५०४७) भरधाव वेगाने येताना दिसली. पोलिसांनी थांबण्याचा इशारा केल्यावर चालकाने रस्त्याकडेला वाहन थांबविले. पोलिसांनी तपासणी केली असता आतमध्ये सुगंधी तंबाखू आणि गुटखा असल्याचे निदर्शनास आले. त्यासंदर्भात चालक मधुसूदन मगदूम याच्याकडे विचारणा केली असता त्याने समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे पोलिसांनी कसून चौकशी केली.

पोलिस चौकशीत चालक मगदूम याने कर्नाटकातील कुडची येथील प्रोपायटर पाटील ( पूर्ण नाव माहिती नाही) याच्या गोदामामधून भरण्यात आल्याचे निष्पन्न झाले. तसेच स्वप्नील प्रभाकर लुगडे (रा. समतानगर, गल्ली क्र. १४, मिरज ) याच्या सांगण्यावरुन हा माल तेथे भरुन समतानगर येथे पोहचविण्यात येणार असल्याची कबुली दिली. संशयित मगदूम याच्यावर मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस कर्मचारी संकेत मगदूम यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

निरीक्षक सतीश शिंदे, सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन, कर्मचारी अमोल लोहार, आमसिद्ध खोत, अमोल ऐदाळे, अमर नरळे, संजय कांबळे, सोमनाथ गुंडे, सोमनाथ पतंगे, रोहन घस्ते, सुनिल जाधव, सूरज थोरात, कॅप्टन गुंडवाडे यांच्या पथकाने कारवाई केली.दोन दिवसात मोठी कारवाई-अंकली फाट्यावर १४ लाख ८१ हजाराची सुगंधी तंबाखू, गुटखा, पानमसाला याचा साठा सांगली ग्रामीण पोलिसांनी जप्त केला होता. त्यानंतर गुन्हे अन्वेषणच्या पथकाने म्हैसाळजवळ १७ लाख ३० हजाराचा साठा जप्त केला