शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

ऊस वाहतूक ठेकेदारांना १७ लाखांचा गंडा

By admin | Updated: July 9, 2017 00:20 IST

तिघांविरुद्ध गुन्हा : मजूर पुरविण्याचे आमिष; ठेकेदार म्हैसाळ येथील

लोकमत न्यूज नेटवर्कमिरज : ऊस तोडणी कामगारांचा पुरवठा करण्याचे आमिष दाखवून म्हैसाळ (ता. मिरज) येथील दिलीप दुंडाप्पा कोरे, रावसाहेब इराप्पा शहापुरे व संजय जयवंत शिंदे या तीन ऊस वाहतूक ठेकेदारांना साडेसतरा लाखांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी जामनेर व पाचोरी येथील तिघांविरुद्ध मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शेनफड सुलेमान तडवी, शामधर रमजान तडवी (दोघे रा. जामनेर, जि. जळगाव) व मधुकर चंद्रसिंग पाटील (पाचोरा, जि. जळगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्या ठकसेनांची नावे आहेत. इचलकरंजी (जि. कोल्हापूर) येथील पंचगंगा साखर कारखाना व आरग (ता. मिरज) येथील मोहनराव शिंदे साखर कारखान्यास ऊस वाहतुकीसाठी फिर्यादींनी भाड्याने ट्रॅक्टर लावले होते. ऊस वाहतुकीसाठी या तिघांना ऊस तोडणी मजूरांची गरज होती. त्यासाठी या तिघांनी संशयित शेनफड तडवी, शामधर तडवी व मधुकर पाटील या ऊसतोड मजूर पुरविणाऱ्या ठेकेदारांशी संपर्क साधला. तडवी व पाटील यांनी कमी दरात म्हणजे ३५ हजारात मजुरांची एक जोडी पुरवितो, असे सांगून शंभर ऊसतोड मजूर देण्यासाठी तिघांकडून साडेसतरा लाख रुपये रोख रक्कम घेतली. मजूर पुरविण्यासाठी रक्कम घेतल्याचे त्यांनी लिहूनही घेतले. गतवर्षी २५ ते ते २९ सप्टेंबर २०१६ या कालावधीत हा व्यवहार झाला होता; पण प्रत्यक्षात संशयितांनी मजूर पुरविलेच नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडे पैशाची मागणी करण्यात आली; पण ते पैसे देण्यास टाळाटाळ करीत होते. त्यामुळे ऊस वाहतूकदार तीनही ठेकेदारांनी शुक्रवारी रात्री मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. दक्षिण महाराष्ट्रात ऊस तोडणी मजूरांची टोळी देतो असे सांगून ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर, ट्रक मालकांची फसवणूक करण्याचे प्रकार दरवर्षी घडतात. या प्रकारांना आळा घालण्यात पोलिसांनाही अपयश आले आहे.