शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

आबांच्या स्मारकाचे १६ रोजी भूमिपूजन

By admin | Updated: August 8, 2016 23:36 IST

जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक : एका वर्षात काम पूर्ण करण्याचा निर्णय

सांगली : माजी मंत्री आर. आर. पाटील यांच्या स्मृती जतन करण्यासाठी शहरातील महात्मा गांधी वसतिगृह परिसरात उभारण्यात येणाऱ्या स्मारकाचे मंगळवार, दि. १६ आॅगस्टला, आबांच्या जयंतीदिनी भूमिपूजन करण्यात येणार आहे. सोमवारी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत याबाबतचे नियोजन करण्यात आले. एका वर्षात स्मारकाचे काम पूर्ण करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. भूमिपूजन कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांच्या उपस्थितीतही एक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे आ. सुमनताई पाटील यांनी सांगितले. १२ आॅगस्टला मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्री जिल्हा दौऱ्यावर येणार असून त्यांच्याकडून स्मारक स्थळाची पाहणी करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही पाटील यांनी सांगितले. राज्य शासनाने आबांच्या स्मारकाला दहा कोटींच्या निधीला मंजुरी दिली असून यातील पाच कोटी रूपये निधी प्राप्त झाला आहे. स्मारकामध्ये संग्रहालय, सभागृह, ग्रंथालय, कलादालन, ज्यामध्ये आर. आर. आबांच्या कारकीर्दीतील महत्त्वाच्या चित्रांचा समावेश असणार आहे. स्मारकाला देण्यात येणारा रंगही आबांच्या स्वच्छ प्रतिमेला साजेसा असा पांढरा देण्यात येणार असून स्मारकाला विधानभवनाप्रमाणे आकार देण्याचा आराखडा यावेळी सादर करण्यात आला. आ. सुमनताई पाटील यांनी सांगितले की, आबांच्या जयंतीदिनी जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत भूमिपूजन होणार असून एका वर्षाच्या आत स्मारकाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. केवळ स्मारकाचे बांधकाम न करता वसतिगृहसुध्दा अद्ययावत करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्वसामान्यांना, विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरेल असे स्मारक उभारण्यासाठी प्रयत्नशील आहोत.यावेळी जिल्हा बॅँकेचे संचालक सुरेश पाटील, स्मिता पाटील, ताजुद्दिन तांबोळी, वास्तुविशारद प्रमोद चौगुले उपस्थित होते. (प्रतिनिधी)ुवसतिगृहाला नाव द्या गांधी वसतिगृहाच्या जागेवर होणाऱ्या आर. आर. पाटील यांच्या स्मारकास विरोध नाही. मात्र, याठिकाणी होणारे स्मारक वसतिगृहरूपी होऊन त्याचा केवळ शैक्षणिक कारणासाठीच उपयोग व्हावा, अशी मागणी महात्मा गांधी वसतिगृह बचाव आजी-माजी विद्यार्थी कृती समितीच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. स्मारकाची उभारणी करताना वसतिगृहाची क्षमता वाढविण्यासाठीही प्रयत्न झाले पाहिजेत. सध्या १५० विद्यार्थी राहू शकतात. पण हजार विद्यार्थी राहू शकतील असे वसतिगृह बांधून त्याला आबांचे नाव देण्याची मागणीही करण्यात आली. समितीचे महेश खराडे, कबीर मुलाणी, प्रतीक पाटील, सागर चव्हाण, विजय गडदे आदींनी हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.