शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा आश्चर्यचकित करणारा निर्णय ! टॅरिफ पद्धतीत बदल, 'या' वस्तूंवर दिली सूट
2
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
3
बदला घेण्यासाठी बिहारी व्यक्तीनं रचला कांड; ऐन गणेशोत्सवात मुंबईत पसरवली दहशत, पोलिसांची झोप उडवली
4
“त्यांच्या सल्ल्यामुळेच उद्धव ठाकरे सत्तेवरून पायउतार झाले”; केंद्रीय मंत्र्यांचा खोचक टोला
5
तब्बल २२ वर्षे सुरू होता घटस्फोटचा खटला, अखेर कोर्टाने दिली मंजूरी! पण वेगळं होण्याचं कारण ऐकाल तर हैराण व्हाल!
6
किम जोंग उनला लादेनप्रमाणेच मारण्याची तयारी, सैनिकही पाठवले, पण एक चूक झाली आणि फसला अमेरिकेचा प्लॅन 
7
Mumbai: विद्यार्थी एक दिवस शिक्षकांच्या भूमिकेत; वर्गांवर घेतला तास!
8
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
9
काय आहे 'Bharat Taxi', काय आहे त्याबाबत मोठी अपडेट? Ola-Uber ची झोप उडणार, तुम्हाला फायदा
10
UPतील बड्या नेत्याचा मुलगा, हत्येप्रकरणी दोषी,आता तब्बल २२ वर्षांनी लहान तरुणीशी केलं लग्न, कोण आहे ती?
11
"गणपती दरम्यान मुंबईत स्फोट घडवणार", लष्कर-ए-जिहादीच्या नावाने केलेला मेसेज! आरोपीला पोलिसांनी केली अटक
12
Viral Video : ट्रेनचा 'हँडसम' टीटीई बनला सोशल मीडिया सेन्सेशन! प्रवास करणाऱ्या तरुणीची नजर हटेना
13
Ganesh Visarjan: विसर्जनातील विघ्न टाळण्यासाठी ८४ रस्ते आज बंद
14
VIDEO: उब्जेकिस्तानची Robiya Havasguruhi भारतात तुफान VIRAL, जगभरातून होतंय कौतुक; कारण...
15
अमेरिकन मंत्री संतापला, भारताला म्हणाला, माफी मागा...; PM नरेंद्र मोदींसमोर ठेवल्या ४ अटी
16
"स्वस्ताईचा लाभ लोकांपर्यंत पोहोचला नाही तर खैर नाही..."
17
BEST: आणखी एका बसचा ‘कोस्टल’वर गारेगार प्रवास!
18
Metro: ‘मेट्रो-६’ डेपोच्या जागेचा तिढा सुटेना!
19
'ऑपरेशन सिंदूर'चे ८८ तास... लष्करप्रमुख 'पडद्यामागची गोष्ट' सांगत म्हणाले- "त्या वेळी..."
20
राष्ट्रपतींच्या हस्ते महाराष्ट्रातील ६ शिक्षकांना ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’

‘ताकारी-म्हैसाळ’साठी मिळणार १६५0 कोटी

By admin | Updated: June 14, 2016 00:04 IST

शशी शेखर : संजय पाटील यांना दिली माहिती

सांगली : जिल्ह्यातील ताकारी-म्हैसाळ योजना मार्च २0२0 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून त्यासाठी पुढील तीन वर्षात १ हजार ६४३ कोटी ८९ लाख रुपयांचा निधी केंद्र व राज्य सरकार उपलब्ध करून देणार आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाचे सचिव शशी शेखर यांनी खासदार संजयकाका पाटील यांना एका पत्राद्वारे दिली आहे. या पत्राबाबत संजयकाका पाटील यांनी सांगितले की, ताकारी-म्हैसाळ योजना २0२0 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र सरकारने ठेवले आहे. त्यासाठी वेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रमांतर्गत (एआयबीपी) केंद्र सरकारही आपला हिस्सा वेळेवर व सुनियोजित पद्धतीने देणार आहे. केंद्रीय जलसंपदा खात्याच्या माहितीनुसार, हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी १ हजार ६४३ कोटी ८९ लाख रुपये लागणार आहेत. चालूवर्षी ८0 कोटी, २0१७-१८ या वर्षाकरिता ४0४ कोटी ५ लाख, २0१८-१९ साठी ५५९ कोटी ३९ लाख आणि २0१९-२0२0 या वर्षाकरिता ६00 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याबाबतचा आराखडा केंद्र व राज्य शासनाने तयार केला आहे. या प्रकल्पाच्या खर्चामधील 0.५७७ टक्के हिस्सा केंद्र शासन, तर 0.४२३ टक्के हिस्सा राज्य सरकार उचलणार आहे. योजनेमधील केंद्र सरकारकडे गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असलेला सुमारे १८२ कोटी ८0 लाखाचा निधीसुद्धा तातडीने उपलब्ध करून देण्याची लेखी मागणी आम्ही केंद्रीय जलसंपदामंत्री उमा भारती यांच्याकडे केली होती. निधी कमी झाल्याने या प्रकल्पांचा वेग मंदावला असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. २0१४-१५ च्या सुधारित खर्चात मोठी कपात केली होती आणि ती २0१५-१६ मधील तरतूदच संपुष्टात आली. त्यामुळे दोन्ही वर्षात केंद्राकडून या प्रकल्पाला निधी दिला गेला नव्हता. आता हा प्रकल्प मार्च २0२0 मध्ये पूर्ण करण्याचे निश्चित झाल्याने पुढील तीन वर्षे निधीची कोणतीही अडचण येणार नाही, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)