शहरं
Join us  
Trending Stories
1
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
2
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
3
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
4
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
5
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
6
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
7
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
8
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
9
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
10
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
11
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
12
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
13
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू
14
ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा...
15
‘हा तर मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे’, PM मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची बोचरी टीका
16
एका कुशीवरुन दुसऱ्या कुशीवर... पण काही केल्या झोपच येईना; 'या' ६ टिप्स गाढ झोपेमागचं रहस्य
17
'बीडमध्ये पोलिसांना आपले आडनाव लावता येत नसेल तर...', धनंजय मुंडेंनी व्यक्त केली खंत
18
चित्रकूट पर्वतावर पुजेसाठी जमलले! ५० जणांवर अचानक वीज कोसळली; ओडिशात धक्कादायक घटना
19
एका शेअरने बदललं गुंतवणूकदारांचे नशीब! १ लाखाची गुंतवणूक ५ वर्षांत झाली ३४ लाखांहून अधिक
20
Travel : परदेशात जायचंय? 'हे' देश आहेत भारतीयांसाठी व्हिसा फ्री, ४० हजारात होईल एका देशाची ट्रिप!

जिल्हा बँकेच्या ठेवीत १५५ कोटींची भर

By admin | Updated: October 6, 2015 00:23 IST

संपर्क अभियानाचा परिणाम : एटीएम, मास्टर कार्ड व आॅनलाईन बँकिंगचे पाऊल

सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेचे पदाधिकारी आणि अधिकारी यांनी सुरू केलेल्या संपर्क अभियानास जिल्हाभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मोहिमेच्या पंधरा दिवसातच जिल्हाभरातून तब्बल १५५ कोटी ९0 हजार रुपयांच्या ठेवी बँकेत जमा झाल्या आहेत, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. ते म्हणाले की, संपर्क अभियानाच्या माध्यमातून पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी थेट ग्राहकांशी संपर्क साधला. प्रत्येक तालुक्यात दौरा करून त्याठिकाणच्या ग्राहकांच्या अडीअडचणी समजावून घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न या अभियानातून करण्यात आला. सुरुवातीपासूनच अभियानाला मोठा प्रतिसाद लाभला. पक्षीय मेळाव्याप्रमाणे या ग्राहक अभियानातील सभांना गर्दी झाली. संपर्क अभियान सुरू होण्यापूर्वी २१ सप्टेंबरला बँकेकडे ३ हजार ६५ कोटी ६६ लाख ६९ हजारांच्या ठेवी होत्या. सध्या या ठेवी ३ हजार २२0 कोटी ६७ लाख ५९ हजारावर गेल्या आहेत. यावर्षी बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांना ४ हजार ५00 कोटी ठेवींचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ठेवी वाढविण्याबरोबरच त्याप्रमाणात कर्जवाटपाचेही उद्दिष्ट देण्यात आले आहे. ग्राहक संपर्क अभियानातून सेवेसंदर्भात बऱ्याच गोष्टी समोर आल्या. अनेक ग्राहकांनी पीक कर्जाची मर्यादा वाढविण्याची मागणी केली. राष्ट्रीयीकृत बँकांच्या तुलनेत जिल्हा बँकेची कर्जमर्यादा कमी असल्याची तक्रार करण्यात आली. फळबागांच्या कर्जवाटपाबाबतही अशाच स्वरुपाच्या तक्रारी आहेत. ऊस लागवडीच्या प्रकारानुसार होणाऱ्या कर्जवाटपाबाबतही अनेक ग्राहकांनी आक्षेप घेतला. सरसकट ऊस लागवडीसाठी समान धोरण ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. काही ठिकाणी बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांबाबत तक्रारी होत्या. ग्राहकांच्या तक्रारींची नोंद बँक अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. या सर्व गोष्टी संचालक मंडळासमोर ठेवून योग्य ते सर्व निर्णय घेतले जाणार आहेत. (प्रतिनिधी)एटीएमची मागणी--अनेक तालुक्यांमध्ये, गावांमध्ये ग्राहकांनी एटीएम यंत्र बसविण्याची मागणी केली. काही ग्राहकांनी अन्य बँकांच्या एटीएममध्ये चालणारे मास्टर कार्ड सुरू करण्याची मागणीही केली. त्यानुसार शक्य त्याठिकाणी एटीएम यंत्र व ग्राहकांच्या मागणीप्रमाणे मास्टर कार्ड देण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल, असे पाटील यांनी सांगितले.