शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

पवनचक्की कंपनीला १५.४० लाखांचा गंडा

By admin | Updated: March 2, 2016 00:48 IST

एकाच जमिनीची दोघांना विक्री : बलवडी (खा.) येथील प्रकार

विटा : खानापूर तालुक्यातील बलवडी (खा.) येथील एकाच गटातील ९५ आर शेतजमिनीची दोघांना विक्री करून पवनचक्की कंपनीला सुमारे १५ लाख ४० हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला. बलवडी (खा.) येथील नितीन गायकवाड यांचे अज्ञान पालक वडील सिध्देश्वर काकासाहेब गायकवाड यांनी त्यांच्या मालकीची गट नं. ५०७ मधील ९५ गुंठे शेतजमीन दि. १८ सप्टेंबर २००८ रोजी जाधववाडी येथील यशोदा जगन्नाथ जाधव यांना ९५ हजार रुपयांना खरेदी दिली होती. त्यानंतर सिध्देवर गायकवाड हे मृत झाले. त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा नितीन हा सज्ञान झाल्यानंतर दि. २१ आॅक्टोबर २००९ रोजी वडिलांनी खरेदी दिलेली शेतजमीन यशोदा जाधव यांच्या नावे नोंद व्हावी, यासाठी नितीन याने प्रतिज्ञापत्र दिले.दरम्यान, हे सर्व माहिती असतानाही त्याच गट नं. ५०७ मधील ९५ गुंठे शेतजमीन नितीन गायकवाड याने दि. १७ नोव्हेंबर २०१२ ला पुन्हा एस. बी. आदित्य पॉवर प्रोजेक्ट प्रा. लि. या पवनचक्की कंपनीला साठेखत, करारपत्र व कुलमुखत्यारपत्र करून देऊन १५ लाख ४० हजार रुपये कंपनीकडून घेतले. या व्यवहाराला नितीन याची आई श्रीमती अलका गायकवाड यांनी सहमती दिली होती. मात्र, एकाच गटातील शेतजमिनीवर दोघांकडून पैसे उचलल्याचे लक्षात आल्यानंतर कंपनीचे प्रतिनिधी दादासाहेब साठे यांनी मंगळवारी विटा पोलिसांत नितीन गायकवाड व श्रीमती अलका गायकवाड यांच्याविरुध्द फिर्याद दिली. याप्रकरणी नितीन व अलका गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून, उपनिरीक्षक अमोल शिंदे तपास करीत आहेत. (वार्ताहर)माय-लेकाविरूध्द गुन्हासंशयित नितीन सिध्देश्वर गायकवाड व त्याची आई अलका सिध्देश्वर गायकवाड (दोघेही रा. बलवडी-खा.) या दोघा माय-लेकांविरुध्द विटा पोलीस ठाण्यात मंगळवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. एस. बी. आदित्य पॉवर प्रोजेक्ट या पवनचक्की कंपनीचे सुपरवायझर दादासाहेब साठे यांनी फिर्याद दिली आहे.