शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका क्षेत्रातील १५ हजार मालमत्ता नोंदीविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:29 IST

सांगली : महापालिका क्षेत्रातील तीनही शहरांत रेकाॅर्डवर नसलेल्या १५ हजारांहून अधिक मालमत्ता आहेत. या मालमत्तांचा शोध घेण्यासाठी लवकरच सर्व्हे ...

सांगली : महापालिका क्षेत्रातील तीनही शहरांत रेकाॅर्डवर नसलेल्या १५ हजारांहून अधिक मालमत्ता आहेत. या मालमत्तांचा शोध घेण्यासाठी लवकरच सर्व्हे हाती घेण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली. मालमत्तांसोबतच पाणी कनेक्शनचा सर्व्हे केला जाणार असून, गायब असलेल्या मालमत्ता रेकाॅर्डवर आल्यास १० कोटींनी उत्पन्न वाढेल, असेही ते म्हणाले.

आयुक्त कापडणीस म्हणाले, गेल्या काही वर्षांत सांगली, मिरज व कुपवाड शहरांत नवीन बांधकामे, मालमत्ता मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्या आहेत. यातील काही मालमत्तांचीच नोंद घरपट्टी कार्यालयाकडे झालेली नाही. त्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे. रेकाॅर्डवर नसलेल्या नवीन व जुन्या मालमत्तांचा शोध घेऊन त्यांना घरपट्टी लागू करण्यासाठी सर्व्हे करण्यात येणार आहे. निवासी, व्यापारी तसेच शासकीय मालमत्ता, शासकीय कार्यालये, खुले भूखंड यांचा सर्व्हे करून त्यांना क्रमांक देण्यात येणार आहेत.

महापालिका क्षेत्रात सध्या एक लाख ३८ हजार ३८६ मालमत्ता आहेत. काही वर्षांपूर्वी प्राथमिक स्तरावर केलेल्या सर्व्हेत साडेपाच हजार मालमत्ता विनाकर आढळून आल्या होत्या. या सर्व मालमत्तांना कर आकारणी करण्यात आली. त्यामुळे महापालिकेचे उत्पन्न आठ कोटींनी वाढले. अजूनही महापालिका क्षेत्रात सुमारे १५ हजार मालमत्तांना कर आकारणी होत नसल्याचा अंदाज आहे. त्या शोधून त्यांना कर आकारणी केल्यास दहा कोटींपेक्षा जास्त उत्पन्नात वाढ होईल. प्रत्येक कर्मचाऱ्यांना एक हजार घरे देण्यात आली आहेत. घरपट्टी विभागातील कर्मचाऱ्यांसोबतच पाणीपट्टी विभागातील कर्मचारीही पाणी कनेक्शनचा सर्व्हे करणार आहेत. मालमत्तांच्या तुलनेत पाणी कनेक्शनची संख्या कमी आहे. सध्या महापालिका क्षेत्रात ८५ हजार ५४६ पाणी कनेक्शन आहेत.

चौकट

खुल्या प्लॉटनाही कर

शहरातील उपनगरे व विस्तारित भागात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी प्लॉट घेतलेले आहेत. मात्र, त्यांची नोंद महापालिकेकडे नाही. या प्लॉटची स्वच्छताही मालमत्ताधारकांकडून केली जात नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. आता सर्व्हेमध्ये खुले प्लाॅटही मिळून येणार असून, त्यांनाही कर लावला जाईल, असेही आयुक्त कापडणीस यांनी स्पष्ट केले.