शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

१५० कोटीची एलबीटी वसूल करणारच

By admin | Updated: August 25, 2014 23:36 IST

अजिज कारचे : व्यापाऱ्यांना फटकारले; महापालिकेच्या कारवाईचे समर्थन

सांगली : महापालिकेकडून एलबीटी वसुलीसाठी सुरू असलेल्या कारवाईचे जोरदार समर्थन करीत आयुक्त अजिज कारचे यांनी आज, सोमवारी व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाला फटकारले. तब्बल दीड वर्ष कारवाई केली नव्हती. आता मात्र वसुलीसाठी माघार घेणार नाही. सध्याची कारवाई मागील दीड वर्षातील १५० कोटींच्या थकबाकीसाठी आहे. ही थकबाकी व्याज, दंडासह वसूल करणारच, असेही त्यांनी स्पष्ट केले. व्यापाऱ्यांनी आज सांगली बंदची हाक दिली होती. सकाळी व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आयुक्त कारचे यांची भेट घेतली. यावेळी नगरसेवक गौतम पवार, समीर शहा, विराज कोकणे, सुदर्शन माने, आप्पा कोरे यांच्यासह व्यापारी उपस्थित होते. यावेळी समीर शहा म्हणाले की, व्यापाऱ्यांच्यादृष्टीने आयुक्त व प्रशासनाची प्रतिमा आजही चांगली आहे; पण एलबीटीचा एक रुपयाही भरण्याची आमची तयारी नाही. प्रशासनाकडून दडपशाही सुरू आहे. त्यावर आयुक्तांनी व्यापाऱ्यांची उलटतपासणी घेतली. महापालिका हद्दीत २१ मे २०१३ पासून एलबीटी लागू झाला आहे. गेले दीड वर्ष व्यापाऱ्यांवर कडक कारवाई केलेली नाही. मग दडपशाही कसली? आता मात्र सांगलीच्या जनतेला सुविधा देण्यासाठी कराची वसुली करावीच लागणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. इतर महापालिकांतील उत्पन्नावरही व्यापारी व आयुक्तांत खडाजंगी झाली. आयुक्तांनी वसई-विरारसह इतर ड वर्ग महापालिकांचा दाखला देत, तेथील उत्पन्न ३०० पटीने वाढल्याचे सांगितले. त्याला व्यापाऱ्यांनी हरकत घेतली. एलबीटीची वाढ नैसर्गिक आहे, पण सांगलीतील व्यापारच उद्ध्वस्त झाला आहे, त्यामुळे उत्पन्नात वाढ होणार नाही, असे गौतम पवार यांनी स्पष्ट केले. आयुक्त कारचे यांनी कारवाईचे समर्थन केले. महापालिकेने गेल्या दीड वर्षातील एलबीटीचीबाकी वसूल करण्यासाठी कारवाई हाती घेतली आहे.जकात असताना रस्ते कुठे चांगले होते?व्यापाऱ्यांनी एलबीटी भरला असता, तर सांगलीतील रस्ते खड्डेमुक्त झाले असते, असा मुद्दा आयुक्तांनी मांडला. त्याला जोड देत आयुक्तांनी गौतम पवार व भाजपच्या एका आमदारांना ‘तुम्हीच रस्ते चांगले करा म्हणून शिष्टमंडळ घेऊन येत होता’ असा टोला लगावला. आयुक्तांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे पवार व आमदारही गप्प झाले. मात्र, व्यापाऱ्यांनी आक्रमकता सोडली नाही. जकात होती, तेव्हा तरी कुठे चांगले रस्ते होते, असे प्रत्युत्तर दिले. यावरून प्रशासन व व्यापारी शिष्टमंडळात वाद झाला.  

व्याज, दंडासह थकबाकीराज्य शासनाने एलबीटी व जकात हे दोनच पर्याय दिले आहेत. सध्या प्रशासनाने दीड वर्षातील थकबाकीची मागणी व्यापाऱ्यांकडे केली आहे. प्रशासनाने सामंजस्याने व सलोख्याने व्यापाऱ्यांशी वेळोवेळी चर्चा करून कर भरण्याचे आवाहन केले होते. कारवाईबाबत पूर्वसूचना दिली होती. त्यामुळे व्यापाऱ्यांकडून होणाऱ्या दडपशाहीच्या आरोपाबाबत सहमत नाही. व्यापारी नेत्यांनी जनतेची दिशाभूल करू नये. मागील थकबाकी व्याज व दंडासह व्यापाऱ्यांना भरावीच लागेल. त्यात कोणतीही तडजोड केली जाणार नाही, अशी भूमिका आयुक्त अजिज कारचे यांनी घेतली.