शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

१५ लाख भाविकांनी घेतले बाहुबलींचे दर्शन : श्रवणबेळगोळमध्ये गर्दीचा ओघ कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 19:57 IST

शीतल पाटीलश्रवणबेळगोळ : येथील भगवान बाहुबली स्वामी महामस्तकाभिषेक महोत्सवात ७ फेब्रुवारीपासून आजअखेर तब्बल १५ लाख भाविकांनी हजेरी लावली आहे. मुख्य मस्तकाभिषेकाला सुरुवात झाल्यापासून भाविकांसह राजकीय नेते, लोकप्रतिनिधींची गर्दी वाढू लागली आहे. मंगळवारी चौथ्यादिवशी १००८ कलशांनी बाहुबलींच्या मूर्तीवर पंचामृत अभिषेक करण्यात आला.श्रवणबेळगोळ येथे बाहुबली महामस्तकाभिषेक महोत्सव २६ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. चारुकीर्ती ...

ठळक मुद्देचौथ्यादिवशी १००८ कलशांनी अभिषेक श्रवणबेळगोळ येथे बाहुबली महामस्तकाभिषेक महोत्सव २६ फेब्रुवारीपर्यंत

शीतल पाटीलश्रवणबेळगोळ : येथील भगवान बाहुबली स्वामी महामस्तकाभिषेक महोत्सवात ७ फेब्रुवारीपासून आजअखेर तब्बल १५ लाख भाविकांनी हजेरी लावली आहे. मुख्य मस्तकाभिषेकाला सुरुवात झाल्यापासून भाविकांसह राजकीय नेते, लोकप्रतिनिधींची गर्दी वाढू लागली आहे. मंगळवारी चौथ्यादिवशी १००८ कलशांनी बाहुबलींच्या मूर्तीवर पंचामृत अभिषेक करण्यात आला.

श्रवणबेळगोळ येथे बाहुबली महामस्तकाभिषेक महोत्सव २६ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. चारुकीर्ती भट्टारक स्वामी यांच्या नेतृत्वाखाली ७ फेब्रुवारीपासून या महोत्सवाची सुरुवात झाली. सुरुवातीला पंचकल्याण विधी पार पडला. या महोत्सवात ८ ते ९ लाख भाविक सहभागी झाले होते. मस्तकाभिषेकाला सुरुवात झाल्यापासून भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, कोलकाता, दिल्ली, मध्यप्रदेश या राज्यातून भाविक बाहुबलींच्या दर्शनाला येत आहेत. आतापर्यंत १५ लाख लोकांनी सोहळ्याला उपस्थिती लावल्याचे महोत्सव समितीचे राष्ट्रीय सचिव सुरेश पाटील यांनी सांगितले. त्यात रविवार, सोमवारी सलग सुटीमुळे लाखो भाविकांनी हजेरी लावली.

सोहळ्यासाठी येणाºया भाविकांना मोफत भोजनाची व्यवस्था केली आहे. २० भोजनगृहात दररोज हजारो लोकांना भोजन वाटप केले जात आहे. त्यागीनगर, कलशनगर, यात्रीनगर, स्वयंसेवकनगर, पंचकल्याणनगरातील सर्व आवास भरले आहेत.

विंध्यगिरी पर्वतासोबतच चंद्रगिरी पर्वतावरही दर्शनासाठी रांगा लागल्या आहेत. चंद्रगिरीवरून मस्तकाभिषेक पाहण्याची सोय केली आहे. तिथे येणाºया लोकांना लिंबू-सरबताचे वाटप केले जात आहे. याची जबाबदारी सांगलीच्या मोहन चौगुले, राजगौंडा पाटील यांच्यावर सोपविली आहे. चंद्रगिरीवर दररोज चिन्मयसागर महाराज (जंगलवाले बाबा) यांचे प्रवचन होत आहे. कर्नाटक सरकारच्या सांस्कृतिक विभागातर्फे चामुंडराय सभामंडपात रोज सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.अनिवासी भारतीयांना आज अभिषेकाचा मानबाहुबली मस्तकाभिषेक सोहळ्याच्या चौथ्यादिवशी १००८ कलशांनी अभिषेक करण्यात आला. जल, नारळ पाणी, उसाचा रस, चंदन, केशर अशा विविध द्रव्यांचा अभिषेक झाला. बुधवारी अनिवासी भारतीयांच्या हस्ते अभिषेक होणार आहे. यात १५० अनिवासी भारतीय सहभागी होतील.श्रवणबेळगोळ येथे मंगळवारी भगवान बाहुबली स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करण्यात आला.विंध्यगिरी पर्वतावर भगवान बाहुबलींचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची रांग लागली होती.चंद्रगिरी पर्वतावर भाविकांसाठी सरबताचे वाटप करण्यात येत होते. यावेळी सांगलीचे मोहन चौगुले, राजगौंडा पाटील उपस्थित होते.