शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा वरदहस्त दूर अन् वैभव खेडेकरांचे ग्रहच फिरले? भाजप प्रवेश रखडला, आता दुसरीकडे...
2
मित्रासोबत बाहेर फिरायला मेडिकलची विद्यार्थीनी गेली, लैंगिक अत्याचाराचा आरोप; रुग्णालयात उपचार सुरू
3
तिसऱ्या भिडूमुळे आघाडीत धुसफुस? काँग्रेसचा ‘त्या’ मतांवर डोळा, तर उद्धवसेनेची मोठी पंचाईत!
4
तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकीच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना No Entry; विरोधक आक्रमक, प्रियांका गांधींचा PM मोदींवर निशाणा
5
मंत्री बाबासाहेब पाटलांनी केलेल्या विधानावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; थेट फटकारले, म्हणाले,..
6
अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना प्रवेश नाही; परराष्ट्र मंत्रालयाची पहिली प्रतिक्रिया
7
"एअर इंडियाच्या बोइंग 787 विमानांची उड्डाणं रोखावीत"; भारतीय पायलट संघाचं सरकारला पत्र; केल्या तीन मागण्या
8
चेन्नई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली; इंडिगो विमानाच्या कॉकपीटच्या काचेला तडा, सर्व ७६ प्रवासी सुखरूप
9
नोबेल पुरस्कार हुकला, ट्रम्प यांनी चीनवर राग काढला? चिनी वस्तूंवर १०० टक्के अतिरिक्त टॅरिफ
10
“लोकशाही वाचवण्यासाठी तुम्हीही पुढाकार घ्या”; राऊतांचे CM फडणवीसांना आवाहन, प्रकरण काय?
11
IND vs WI : अंपायरनं विकेट किपरची चूक झाकली? RUN OUT झाल्यामुळं यशस्वी जैस्वालचं द्विशतक हुकलं (VIDEO)
12
नोबेल हुकले तरी ट्रम्प यांचा तोरा कायम; म्हणाले, “लाखो लोकांचे जीव वाचवल्याचा जास्त आनंद”
13
CM फडणवीसांकडून क्लीन चिट मिळताच योगेश कदमांनी मन मोकळे केले, भली मोठी पोस्ट लिहीत म्हणाले...
14
"माझा शारीरिक छळही झाला", घटस्फोटाबद्दल मयुरी वाघचा धक्कादायक खुलासा, म्हणाली- "ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यानेच..."
15
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
16
सोने-चांदी नव्हे, या धातूने दिले सर्वाधिक रिटर्न; डोळे विस्फारतील, धक्का बसेल... पण खरे आहे... 
17
"सोना कितना सोना है...", घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान करवाचौथला गोविंदाने बायकोला दिला सोन्याचा हार
18
आजचे राशीभविष्य : शनिवार ११ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ होईल, हितशत्रू सरसावतील, एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल
19
संपादकीय: राखेतून शांतता उगवेल? ट्रम्प इस्रायल-हमास युद्ध थांबवू शकणार?
20
नोबेल पुरस्कारापासून वंचित ट्रम्प यांचा रागाने थयथयाट; मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार  

लेंगरेच्या तरुणाकडून मुंबईच्या महिलेला १५ लाखाचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:35 IST

विटा : जर्मनीत डॉक्टर असल्याचा बनाव करून लेंगरेच्या तरुणाने सोशल मीडियाच्या माध्यमातून मुंबईतील वकील महिलेला १४ लाख ९२ हजार ...

विटा : जर्मनीत डॉक्टर असल्याचा बनाव करून लेंगरेच्या तरुणाने सोशल मीडियाच्या माध्यमातून मुंबईतील वकील महिलेला १४ लाख ९२ हजार रुपयांनी गंडा घातल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला. याप्रकरणी वैभव सुरेश शिंदे (वय २९, रा. लेंगरे, ता. खानापूर, जि. सांगली) याला विटा पोलिसांनी अटक केली.

गेल्या वर्षी मे २०२० या महिन्यात कोरोनामुळे लॉकडाऊन लागू असल्याने अनेक जण इंटरनेट, सोशल मीडियाद्वारे एकमेकांच्या संपर्कात होते. याच काळात लेंगरे येथील वैभव शिंदे यानेही फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर भरत जाधव या नावाने खोटे अकाऊंट काढले. दुसऱ्या तरुणाचे छायाचित्र लावून मुंबईतील महिला वकिलाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली. प्रोफाईलमध्ये तो जर्मनीत डॉक्टर असल्याची खोटी माहिती दिली होती. वकील महिलेने त्याच्याशी मैत्री केली.

त्यानंतर चॅटिंग करून वैभव शिंदेने त्या महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्याने आपला मोबाईल क्रमांक तिला सोशल मीडियाद्वारे दिला. व्हाॅट्सॲपच्या माध्यमातूनही दोघांचे चॅटिंग सुरू झाले. त्याने मेसेजेस, फोन कॉल करून आणखी विश्वास संपादन केला.

यादरम्यान वेगवेगळी कारणे सांगून त्याने तिच्याकडून १४ लाख ९२ हजार रुपये घेतले. कोरोनाने आई, वडील आजारी आहेत, चुलत्यांचा मृत्यू झाला, बहिणीच्या पतीची प्रकृती गंभीर आहे. आपण भारतात येण्यासाठी निघतोय, परंतु आपले पाकीट हरविले आहे. त्यात क्रेडिट कार्ड्स‌, डेबिट कार्ड्स‌ होती. तिकडे आल्यानंतर तुमची रक्कम बँकेच्या माध्यमातून ट्रान्सफर करतो, अशा बतावण्या त्याने केल्या. या सर्व गोष्टी खऱ्या वाटल्याने आपण पैसे दिले, असे संबंधित महिला वकिलाने पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

अखेरीस ७ जूनला वैभव शिंदेने अचानक सोशल मीडियावरची भारत जाधव नावाने काढलेली सगळी अकाऊंट्स‌ डीॲक्टिव्हेट केली.

त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने सायबर क्राईम विभागाशी संपर्क साधला. व्हॉट्सॲप क्रमांकावरून तो लेंगरे गावातील वैभव शिंदे यांचा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर महिलेने विटा पोलीस ठाण्याकडे धाव घेतली. पोलीस निरीक्षक संतोष डोके यांना संपूर्ण हकीकत सांगितली. दोघांमधील संभाषणाचे आणि वैभव शिंदेला वेळोवेळी पैसे दिल्याचे पुरावे दिले. त्यावरून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.