बुधवारी रुग्णसंख्येत वाढ झाली होती. गुरुवारी पुन्हा त्यात घट झाली. जिल्ह्यातील ४५ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात सांगली आणि मिरज शहरासह मिरज तालुका, जत तालुक्यात प्रत्येकी ६, खानापूर ५, कडेगाव, पलूस, तासगाव प्रत्येकी ४, आटपाडी २ तर शिराळा कवठेमहांकाळ तालुक्यात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.
उपचार घेत असलेल्या १७ हजार ३३४ रुग्णांपैकी २५६८ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यातील २३०२ जण ऑक्सिजनवर, तर २६६ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
परजिल्ह्यांतील १५ जणांचा मृत्यू झाला असून नवे ६५ रुग्ण उपचारासाठी जिल्ह्यात दाखल झाले आहेत.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित ९६४१३
उपचार घेत असलेले १७३३४
कोरोनामुक्त झालेले ७६२९२
आतापर्यंतचे एकूण मृत्यू २७८७
गुरुवारी दिवसभरात
सांगली ११७
मिरज ८३
जत २३८
मिरज तालुका २१५
वाळवा १३६
कडेगाव १०७
आटपाडी ९८
तासगाव ९४
खानापूर ८८
कवठेमहांकाळ ८१
पलूस ६२
शिराळा ३५