वाळवा : प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आतापर्यंत कोरोनाचे ३६८ रुग्ण आढळून आले आले आहेत. त्यातील २१३ पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. आठजण रुग्णालयात दाखल आहेत. १६ जणांचा मृत्यू झाला, तर १३१ जण होम आयसोलेशनमध्ये आहेत, अशी माहिती डाॅ. वैभव नायकवडी यांनी दिली.
नवे खेड (ता. वाळवा) येथे आजअखेर ५६ कोरोनाबाधित आहेत. त्यातील ४० होम आयसोलेशनमध्ये, तर १५ जण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. एकाचा मृत्यू झाला आहे. जुने खेड येथे १७ पैकी आठजण होम आयसोलेशनमध्ये असून, एक रुग्णालयात आहे. आठजण कोरोनामुक्त झाले आहेत. पडवळवाडी येथे ३९ पैकी नऊजण होम आयसोलेशनमध्ये आहेत. ३० जण पूर्णपणे बरे झाले आहेत.
शिरगाव येथे नऊपैकी तिघे होम आयसोलेशनमध्ये आहेत. सहाजण पूर्ण बरे झाले आहेत. अहिरवाडी येथे सहापैकी चौघे होम आयसोलेशनमध्ये आहेत. दोघे बरे झाले आहेत.