शहरं
Join us  
Trending Stories
1
Maratha Reservation : 'मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देता येईल हे शरद पवारांनी जाहीर करावं'; राधाकृष्ण विखे- पाटलांनी स्पष्टच सांगितलं
2
Maratha Reservation : मराठा आंदोलकांनी सुप्रिया सुळेंची गाडी अडवली, घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला
3
"जीव धोक्यात घालू नका"! मरीन ड्राईव्हवर शेकडो मराठा आंदोलक समुद्रकिनारी खडकांवर उतरले
4
२० तासांचा रहस्यमय प्रवास! चीनला पोहचण्यासाठी किम जोंग यांची सीक्रेट तयारी; शत्रूंना देणार चकवा
5
Maratha Morcha Mumbai: 'मी आयुक्तांना बोलते'; सुप्रिया सुळेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट
6
भाजपच्या माजी आमदार, माजी IPS अधिकाऱ्यासह १४ जणांना जन्मठेप; बिल्डर अन् १२ कोटींचं प्रकरण काय?
7
बाबर आझमची 'मॅचविनिंग' खेळी; शोएब अख्तर, वकार युनिससारख्या दिग्गजांची केली धुलाई
8
ओबीसीतून आरक्षण घेणारच, उद्यापासून पाणीही घेणार नाही; मनोज जरांगे पाटील यांची घोषणा
9
तमिळ सुपरस्टार विशालच्या साखरपुड्याचे फोटो पाहिलेत का? १२ वर्षांनी लहान आहे होणारी पत्नी
10
'नरेंद्र मोदींनी चीनला क्लीन चिट दिली', पंतप्रधानांच्या चीन दौऱ्यावरुन काँग्रेस आक्रमक
11
जिओ की वीआय? रोजच्या २.५GB डेटासाठी कोणता प्लॅन स्वस्त? जाणून घ्या दोन्ही कंपन्यांचे फायदे आणि किंमत
12
Gauri Pujan 2025: गौराईला नैवेद्य अर्पण करण्याआधी ताटाखाली काढा पाण्याचे मंडल आणि म्हणा 'हा' मंत्र
13
"मराठा जातीने मागास नाहीत, न्यायालयात अडकवायचं आहे का?"; पाटलांनी सांगितला ओबीसी आरक्षण देण्यातील अडथळा
14
Mumbai: पर्यावरणपूरक मूर्तीच्या नैसर्गिक जलस्रोतात विसर्जनास परवानगी
15
१५ वर्षीय मुलीच्या मागेच लागला साप; १ महिन्यात ६ वेळा चावला, प्रत्येकवेळी पायावर खुणा सोडल्या
16
दिग्गज क्रिकेटपटूच्या लेकीची मैदानात एन्ट्री; चाहत्यांना सौंदर्याने घायाळ करणारी 'ती' कोण?
17
जातीच्या नावाने हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न; मराठा आंदोलनावरून नितेश राणेंचा दावा
18
"आम्ही भेटायला जाणार होतो पण...", प्रियाच्या निधनाबद्दल समजताच उषा नाडकर्णींना अश्रू अनावर
19
Mumbai: धारावीत मैदान, मोकळ्या जागाच नाहीत; खेळायचे कुठे?
20
Priya Marathe Passes Away: लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठेचं निधन, कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी

पद्माळेत मगरीची १३ पिल्ली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2015 00:44 IST

वनविभागाची पाठ : शेतकऱ्याने नदीत सोडली; कृष्णा काठ भीतीच्या छायेत

सांगली : कृष्णा नदीच्या काठावर मगरींकडून सातत्याने हल्ले होत असताना शुक्रवारी दुपारी सांगलीजवळच्या पद्माळे (ता. मिरज) येथील बजरंग पाटील यांच्या शेतात मगरीची १३ पिल्ली आढळून आली. पाटील यांनी वनविभागास याची माहिती देऊनही एकही कर्मचारी फिरकला नाही. शेवटी पाटील यांनी सर्व पिल्ली नदीत सोडून दिली. सांगली ते औदुंबरपर्यंत कृष्णा नदीच्या पात्रात अकरा मोठ्या मगरी व सत्तरहून अधिक पिल्ली असल्याचे वन विभागाने पंधरवड्यापूर्वी केलेल्या सर्वेक्षणात आढळून आले आहे. गेल्या चार वर्षांत मगरीच्या हल्ल्यात आतापर्यंत सहाजणांचा बळी गेला आहे. याशिवाय मच्छिमार, कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिला, पोहायला गेलेली मुले यांच्यावर सातत्याने हल्ले होत आहेत. वन विभागाकडून नदीकाठी पहारा देण्याशिवाय काहीच होताना दिसत नाही, तर दुसरीकडे मगरींच्या संख्येत वाढ होत असल्याने कृष्णाकाठ भीतीच्या छायेत आहे. पद्माळे येथील बजरंग पाटील यांचे नदीकाठी शेत आहे. शुक्रवारी या शेतात १३ मगरीची पिल्ली आढळून आली. या पिलांसोबत लहान मुले खेळत होती. पाटील दुपारी शेतात वैरण आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी मुलांना या पिलांपासून बाजूला केले. त्यानंतर वनविभागाशी संपर्क साधून याची माहिती दिली. सायंकाळपर्यंत वनविभागाचा एकही कर्मचारी आला नाही. यामुळे पाटील यांनी सर्व पिल्ली पुन्हा नदीत सोडून दिली. पद्माळेत पहिल्यांदाच मगरीची पिल्ली आढळून आली आहेत. यावरून मगरीचे नदीकाठावर वास्तव्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. जेथे पिल्ली सापडली, तेथे अंड्यांची टरफले मात्र आढळून आली नाहीत. (प्रतिनिधी)