सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत गुरुवारी १३ ने भर पडली. कोरोनाबाधितांची संख्या मर्यादीत असली, तरी बरे होणाऱ्यांचेही प्रमाण वाढत आहे. गुरुवारी दिवसभरात १४ जणांनी कोरोनावर मात केली असतानाच सांगलीतील दोघांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
या आठवड्यात बाधितांची संख्या कमी असून, सरासरी २० रुग्णांची नोंद होत आहे. दिवसभरात दाेघांचा मृत्यू झाल्याने कोरोनाने बळींची संख्या १७५२ झाली आहे. गुरुवारी प्रशासनाच्यावतीने आरटीपीसीआरअंतर्गत १८६ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली. त्यात ६ जणांना कोराेनाचे निदान झाले; तर रॅपिड ॲन्टिजेनच्या ५६७ चाचण्यांमधून ७ जण बाधित आढळले आहेत. .
जिल्ह्यातील पाच रुग्णालयांत उपचार घेत असलेल्या ११६ रुग्णांपैकी ३९ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यातील ३५ जण ऑक्सिजनवर, तर ४ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.