शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

तांबवेत एकरी १२५ टन ऊस उत्पादन

By admin | Updated: November 28, 2015 00:17 IST

शेतकऱ्यांपुढे आदर्श : फूलशेतीला बगल देत ऊस उत्पादन

इस्लामपूर : तांबवे (ता. वाळवा) येथील प्रगतशील शेतकरी महिपती हंबीरराव पाटील यांनी जिद्द व चिकाटीच्या जोरावर एका एकरात १२४़ ६६१ मेट्रिक टन इतके विक्रमी उसाचे उत्पादन घेऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे़ पाटील हे राजारामबापू सह. साखर कारखान्याचे कर्मचारी नेताजी पाटील यांचे बंधू आहेत.पाटील यांनी काही वर्षे आपल्या शेतात फूलशेती केली. गेल्यावर्षी त्यांनी आपल्या शेतात ९२ टन उसाचे उत्पादन घेतले़ मात्र राजारामबापू साखर कारखान्याने ‘लक्ष्य एकरी १00 टन उसाचे’ हा प्रकल्प काही वर्षांपूर्वी राबविल्यामुळे सध्या वाळवा तालुक्यात अनेक शेतकरी १00 टनापर्यंत पोहोचले आहेत. सध्या कारखाना व आमदार जयंत पाटील यांनी ‘एकरी १५0 टनाचे लक्ष्य’ शेतकऱ्यांना दिले आहे़ यातूनच प्रेरणा घेऊन कारखान्याच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पाटील यांनी एकरी १५0 टनाचे उद्दिष्ट गाठण्याचा निर्धार केला़पाटील यांनी आपल्या शेताची उत्तम मशागत करून घेऊन साडेचार फुटी सरी सोडली़ यानंतर त्यांनी वाफ्यावर को़ सी़ ८६0३२ या जातीच्या रोपांची लागण केली़ त्यांची २५-३0 दिवसांनी उत्तम वाढ झाल्यानंतर १ डोळा २-२ फुटावर आडसाली लागण केली़ यानंतर त्यांनी बेसल डोस, जिवाणंूची आळवणी घेतली़ ४५ दिवसांनी नत्राची मात्रा सुरू केली़ पहिल्या ४५ दिवसांनी पहिली संजीवके, कीटकनाशकांची फवारणी केली़ यानंतर प्रत्येक २0-२५ दिवसांच्या अंतराने ६ फवारण्या केल्या़ खतांची मात्रा देताना सेंद्रीय खते आणि रासायनिक खतांचा समतोल राखण्याच्या सातत्याने प्रयत्न केला़ हा ऊस राजारामबापू सह़ साखर कारखान्याच्या वाटेगाव-सुरूल युनिटसाठी तोडण्यात आला. तोडणीच्यावेळी प्रत्येक बुडख्यात १४ ते १६ ऊस होते आणि प्रत्येक उसाला सरासरी ४५ ते ४६ कांड्या होत्या़ माजी मंत्री, आमदार जयंत पाटील, अध्यक्ष पी़ आऱ पाटील, उपाध्यक्ष विजयबापू पाटील, कार्यकारी संचालक आऱ डी़ माहुली, शेती अधिकारी आबासाहेब पाटील यांच्यासह अनेक मान्यवर व पदाधिकाऱ्यांनी पाटील यांचे अभिनंदन केले़ (वार्ताहर)