शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यातील १,१५३ गुन्हेगार ‘रडार’वर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 23:50 IST

सचिन लाड। लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आतापासूनच कारवाईची कडक ...

सचिन लाड।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आतापासूनच कारवाईची कडक धडक मोहीम आखण्यास सुरुवात केली आहे.निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जिल्ह्यातील १ हजार १५३ गुन्हेगारांना कारवाईच्या ‘रडार’वर घेण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध ‘मोक्का’, ‘तडीपार’ व ‘झोपडपट्टीदादा’ कायद्यांतर्गत कारवाईचे नियोजन करण्यात आले आहे. हॉटेल, ढाबे, दारूची दुकाने व परमिट बिअर-बार यांनाही शांततेच्याद्दष्टीने ‘टार्गेट’ करण्यात आले आहे.गतवर्षी सांगली महापालिकेची निवडणूक झाली. निवडणुकीसाठी लागू केलेल्या आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्याची सूचना निवडणूक आयोगाने दिली होती. हॉटेल, ढाबे, दारूची दुकाने रात्री अकराला बंद करण्याचे आदेश दिले होते; पण या आदेशाला कोलदांडा दाखविण्यात आला. रात्री अकरानंतरही हॉटेल, दारूची दुकाने सुरू राहिली. यातून मिरज वाहतूक शाखेतील पोलीस शिपाई समाधान मांटे यांचा विश्रामबाग येथे हॉटेल ‘रत्ना डिलक्स’मध्ये निर्घूण खून करण्यात आला.या घटनेची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षकांसह दोन अधिकाऱ्यांना निलंबित केले होते. महापालिकेची निवडणूक शहरातपुरती मर्यादित होती. लोकसभा निवडणुकीचा माहोल संपूर्ण जिल्ह्यात राहणार आहे. महापालिका निवडणुकीत पोलिसाच्या झालेल्या खुनाचा अनुभव लक्षात घेऊन लोकसभा निवडणुकीत कोणाचीही गय न करण्याचा निर्णय पोलीस यंत्रणेने घेतला आहे.खून, खुनाचा प्रयत्न, मारामारी, गर्दी मारामारी, दहशत माजविणे, हत्यार बाळगणे, बेकायदा जमाव जमविणे असे दोनपेक्षा जादा गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांची यादी बनविण्याचे आदेश जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा यांनी जिल्ह्यातील पोलीस अधिकाºयांना दिले आहेत. गेल्या २० वर्षांत झालेल्या सर्व प्रकारच्या निवडणुकीत त्रासदायक ठरलेल्या गुन्हेगारांची यादी बनविली जाणार आहे. स्वत: शर्मा यांनीच गुन्हेगारांची नावे सुचविली आहेत.सांगली, मिरजेसह जिल्ह्यातील जवळपास १ हजार १५३ गुन्हेगारांना कारवाईच्या ‘रडार’वर घेतले आहेत. या सर्वांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे. काही गुन्हेगारांना निवडणूक काळापुरते पंधरा दिवसांसाठी जिल्ह्यातून तडीपार केले जाणार आहे.सहा टोळ्यांना तडीपार, तर तीन टोळ्यांविरुद्ध महाराष्टÑ संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) कायद्यांतर्गत कारवाईचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. ‘अर्धा’ डझन गुन्हेगारांना झोपडपट्टीदादा कायद्यांतर्गत एक वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध केले जाणार आहे.दहा वाजता चिडीचूप होणार जिल्हानिवडणुकीची आचारसंहिता लागताच पोलिसांचे काम खºयाअर्थाने सुरु राहणार आहे. यासाठी हॉटेल्स, ढाबे, दारूची दुकाने, परमिट रुम, बिअर बार, पान दुकाने व खाद्यपदार्थ विक्रीचे गाडे रात्री दहा वाजता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे दहानंतर शहरासह तालुकेही चिडीचूप होणार आहेत. ढाब्यावर दारु सापडली तर केवळ ती जप्त करण्याची कारवाई करु नये. मालकाने दारु कोठून आणली, याचा शोध घेऊन संबंधितावर कारवाईचे आदेश दिले आहेत. खबºयांचे ‘नेटवर्क’ सक्रिय करण्याची सूचनाही शर्मा यांनी केली आहे. पोलीस मित्रांचीही मदत घेतली जाणार आहे.