शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

११४ अतिक्रमणे हटविली

By admin | Updated: January 19, 2016 23:45 IST

महापालिकेची विश्रामबागमध्ये कारवाई : जिमचे बांधकाम पाडले

सांगली : शहरातील शंभर फुटी रस्ता व विश्रामबाग गणपती मंदिर चौकातील ११४ अतिक्रमणांवर मंगळवारी महापालिकेने हातोडा टाकला. यावेळी जिमचे लोखंडी शेड, साहित्य, डिजिटल फलकांसह दूरध्वनीचे खांब काढण्यात आले. महापालिकेच्या आयुक्त पदाचा कार्यभार पुन्हा हाती घेतल्यानंतर अजिज कारचे यांनी अतिक्रमण हटाव मोहीम सुरूच ठेवली आहे. यापूर्वी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी शहरातील अतिक्रमणांविरोधात मोहीम उघडली होती. त्याचे नागरिकांतून स्वागत झाले होते. मंगळवारी सकाळी अकरा वाजल्यापासून सहायक आयुक्त रमेश वाघमारे, शाखा अभियंता आप्पा हलकुडे यांच्या नेतृत्वाखाली पालिकेच्या पथकाने अतिक्रमणांवर कारवाई सुरू केली. पन्नासहून अधिक कर्मचारी, वरिष्ठ अधिकारी, वाहनांचा ताफा घेऊन पालिकेचे पथक रस्त्यावर उतरले होते. सोमवारी महापालिकेच्या पथकाने विनापरवाना बांधकामांना टार्गेट केले होते. गणपती मंदिराजवळील बालाजी सिलेब्रेशन या इमारतीच्या टेरेसवरील जिमवर कारवाई केली होती. मंगळवारीही या जिमचे पत्रे व शेड हटविण्याचे काम सुरूच होते. जिममधील साहित्यही पथकाने ताब्यात घेतले आहे. गणपती मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील मातीचा भराव, चढ-उतार जेसीबीच्या साहाय्याने काढण्यात आला. या रस्त्यावर मातीचा भराव असल्याने वाहने रस्त्यावरच पार्क केली जात होती. हा भराव काढल्याने रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी काही प्रमाणात कमी होणार आहे. या रस्त्यावर बंद असलेले दूरध्वनीचे खांबही काढून टाकण्यात आले. पथकाने शंभर फुटी रस्त्यावरील चेतना पेट्रोल पंप ते हॉटेल डायमंडपर्यंत झालेली अतिक्रमणे काढली. (प्रतिनिधी)डिजिटल फलक जप्तरस्त्यावरील सुमारे ३५ डिजिटल फलक जप्त केले आहेत. चार ठिकाणचे स्लॅब व कट्टे फोडण्यात आले.रस्त्यावर मातीचा भराव असल्याने वाहने रस्त्यावरच पार्क केली जात होती. हा भराव काढल्याने रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी काही प्रमाणात कमी होणार.