शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

जिल्हा बॅँकेत ११.२२ टक्के पगारवाढ

By admin | Updated: July 22, 2016 00:08 IST

संचालक मंडळाच्या बैठकीत पगारवाढीचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे

सांगली : बारा वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर जिल्हा बॅँकेच्या कर्मचाऱ्यांना गुरुवारी ११.२२ टक्के पगारवाढीच्या संचालक मंडळाच्या निर्णयाने सुखद धक्का बसला. या पगारवाढीने वार्षिक पाच कोटी ४० लाख ९५ हजार २५६ रुपयांचा बोजा पडणार असून, व्यवस्थापन व स्टाफ खर्चाची कमाल मर्यादा न ओलांडता ही वाढ देण्यात आली आहे. जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांनी यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना सांगितले की, संचालक मंडळाच्या बैठकीत पगारवाढीचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे. कर्मचारी संघटनांनी केलेल्या मागणीचा विचार करताना, आस्थापना व व्यवस्थापन खर्चाची नियमानुसार असलेली मर्यादा न ओलांडता ही पगारवाढ केली आहे. खेळत्या भांडवलाच्या दोन टक्क्यांपेक्षा जास्त मॅनेजमेंट कॉस्ट असू नये, असा नियम आहे. सध्याच्या पगारवाढीने मॅनेजमेंट कॉस्ट १.९० इतकी होणार आहे. स्टाफ कॉस्ट (कर्मचाऱ्यांवरील खर्च) दीड टक्क्यांपेक्षा जास्त करता येत नाही. सध्याच्या पगारवाढीनुसार हा खर्च १.२५ टक्के इतका झाला आहे. ही पगारवाढ १ एप्रिल २०१६ पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू केली आहे. ३१ मार्च २०१९ पर्यंत पगारवाढीचा हा करार लागू आहे. बॅँकेच्या वार्षिक उत्पन्नात पगारवाढीच्या रकमेपेक्षा जास्त वाढ करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सध्या बॅँकेची आर्थिक स्थिती भक्कम असून, राज्यातील सक्षम बॅँकांमध्ये या बॅँकेची गणना केली जात आहे. त्यामुळेच नियमांच्या अधीन राहून पगारवाढ केली आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून वर्षभरात चांगले काम झाले आहे. भविष्यातही तशीच अपेक्षा असल्याचे ते म्हणाले. यावेळी बॅँकेचे उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, प्रभारी कार्यकारी संचालक बी. एम. रामदुर्ग, व्यवस्थापक मानसिंग पाटील, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)अशी झाली पगारवाढश्रेणी भरतीवेळी निवृत्तीवेळी जुना पगार नवीन पगार जुना पगार नवीन पगार प्रथम १८,४९८२१,७८८५७,८६६६७,८६७द्वितीय १६,५५३ १९,११९५३,६१८६१,८९२तृतीय १४,५५४ १९,१९३५0,५४४ ५७,४७२लिपिकवर्गीय१२,५५५१४,१३0४७,९६६५३,९५0शिपाई११,0३४१२,२८४३९,८0२४४,९२८चालक११,१४२१३,३९५३६,९0१४३,८८७चौकटकर्मचारी संघटनेकडून स्वागतकर्मचारी संघटनेचे सचिव प्रदीप पाटील यांनी या निर्णयाचे स्वागत केले. बॅँक कर्मचारी संघटनेचे राज्याचे नेते खासदार आनंदराव आडसूळ यांनीही दूरध्वनीवरून अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांचे आभार मानले. एक तप प्रतीक्षा जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांना पगारवाढीचा करार करण्यासाठी तब्बल १२ वर्षे प्रतीक्षा करावी लागली. दिलीपतात्या पाटील यांच्या अध्यक्षतेखालील संचालक मंडळाने कर्मचाऱ्यांची ही प्रतीक्षा संपविल्याने कर्मचाऱ्यांमधून आनंद व्यक्त होत आहे.सोनहिरा कारखान्याला सवलतवेळेत कर्ज परतफेड केल्याबद्दल शासनाच्या योजनेनुसार सोनहिरा सहकारी साखर कारखान्यास व्याजात एक टक्का सवलत देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. सवलतीची रक्कम २५ लाख ६८ हजार ६०० इतकी होते.\