शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकल प्रिस्क्रिप्शनमुळे सापडले ११२ कोरोना रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:19 IST

सांगली : औषध दुकानातून सर्दी, तापाची औषधे घेऊन घरीच उपचार घेणाऱ्या रुग्णांची तपासणी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. महिन्याभराच्या ...

सांगली : औषध दुकानातून सर्दी, तापाची औषधे घेऊन घरीच उपचार घेणाऱ्या रुग्णांची तपासणी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. महिन्याभराच्या कालावधीत घरी उपचार घेणाऱ्या तब्बल ६२८ रुग्णांची माहिती महापालिकेला प्राप्त झाली होती. प्रशासनाने कोरोनाची लक्षणे दिसणाऱ्या २०९ रुग्णांची चाचणी केली. त्यात ११२ कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आले. या रुग्णांची वेळीच चाचणी झाल्याने महापालिका क्षेत्रातील कोरोना संसर्ग वाढीपासून रोखण्यात यश आल्याचे दिसून येते.

महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सतर्कतेमुळे मोठा संसर्ग टाळण्यात प्रशासनाला यश आले. अनेक रुग्ण ताप, सर्दी, खोकला झाल्यास कोरोना चाचणी न करताच परस्पर औषध दुकानांतून औषधे घेऊन घरीच उपचार घेत होते. अशा रुग्णांत कोरोना पाॅझिटिव्ह असेल तर संपूर्ण कुटुंबाला बाधा होण्याची धोका होता. हा धोका ओळखून महिन्याभरापूर्वी आयुक्त कापडणीस यांनी शहरातील काही औषध दुकानांना भेटी दिल्या. त्यांच्याकडून कोरोनासदृश लक्षणे असलेल्या रुग्णांकडून औषधे खरेदी करण्यात आल्याची माहिती घेतली. त्यानंतर महापालिकेने शहरातील सर्वच औषधविक्रेत्यांना अशा रुग्णांची मेडिकल प्रिस्क्रिप्शन प्रशासनाकडे सादर करण्याची नोटीस बजाविली. त्यासाठी स्वतंत्र कक्षही सुरू केला.

गेल्या महिन्याभरात शहरातील औषध विक्रेत्यांनी ६२८ रुग्णांची माहिती महापालिकेला दिली. या रुग्णांची नावे, त्यांचे मोबाइल नंबर, पत्ता आणि प्रिस्क्रिप्शन महापालिकेच्या नियंत्रण कक्षाच्या व्हाॅट्सॲप टाकली. महापालिकेने वैद्यकीय अधिकाऱ्यांना संबंधित रुग्णांच्या घरी जाऊन त्यांची तपासणी करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार वैद्यकीय अधिकारी, आशा वर्कर्स यांनी घरभेटी दिल्या. यातून कोरोनासदृश रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात ११२ जण पाॅझिटिव्ह आढळून आले. या रुग्णांवर तातडीने उपचार सुरू केले. वेळीत त्यांची चाचणी करण्यात आल्याने संपूर्ण कुटुंब कोरोनाबाधित होण्यापासून वाचले.

चौकट

सारीच्या रुग्णातून १४९ पाॅझिटिव्ह

महापालिकेने खासगी व शासकीय रुग्णालयांना सारी, आयएलएफवर उपचार घेणाऱ्या रुग्णांची माहिती प्रशासनाला देण्याची सूचना केली होती. त्यानुसार खासगी व शासकीय रुग्णालयांनी ३५८ रुग्णांची माहिती महापालिकेला मिळाली. या सारीच्या रुग्णांपैकी २३३ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात १४९ जण पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत. महापालिकेने कोरोना चाचणी केल्याने वेळीच त्यांच्यावर उपचार होऊ शकले.

कोट

महापालिका क्षेत्रात कोरोनाचा संसर्ग व मृत्युदर आटोक्यात ठेवण्यासाठी विविध उपाययोजना आखल्या. त्याचाच एक भाग म्हणून औषधविक्रेत्यांना कोरोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांची माहिती देण्याची सूचना केली होती. त्याला औषध विक्रेत्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. अनेक रुग्ण कोरोनाची चाचणी न करताच घरी उपचार घेतात. त्यातून गंभीर स्थिती निर्माण झाल्यावर रुग्णालयात दाखल होतात. त्यामुळे रुग्णांच्या मृत्यूचा धोका वाढतो. या प्रयत्नांतून मृत्युदर कमी करण्यासोबतच कुटुंबेही बाधित होण्यापासून रोखली गेली.

- नितीन कापडणीस, आयुक्त, महापालिका