शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीची दहावी यादी अखेर दाखल सात कोटींचा लाभ : सांगली जिल्ह्यातील ३ हजार २३० शेतकरी लाभार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 00:02 IST

गेल्या तीन महिन्यांपासून ज्या यादीची प्रतीक्षा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लागली होती, ती दहावी कर्जमाफीची यादी शनिवारी प्राप्त झाली. सांगली जिल्हा बँकेच्या ३ हजार २३० शेतकºयांचा यात समावेश असून

ठळक मुद्देव्यक्तिनिहाय कर्जमाफी देण्याचा निर्णय शासनाने घेतला पूर्वी कुटुंब गृहीत धरून जाहीर झालेल्या या योजनेची व्याप्ती वाढवण्यात आली.

सांगली : गेल्या तीन महिन्यांपासून ज्या यादीची प्रतीक्षा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लागली होती, ती दहावी कर्जमाफीची यादी शनिवारी प्राप्त झाली. सांगली जिल्हा बँकेच्या ३ हजार २३० शेतकºयांचा यात समावेश असून, त्यांना ७ कोटी ५ लाख ७२ हजार रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे. या शेतकºयांच्या खात्यावर आठ दिवसात रक्कम जमा केली जाणार असल्याचे बँकेच्यावतीने सांगितले.

राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील दहावी ग्रीन लिस्ट यादी आल्यामुळे शेतकºयांना दिलासा मिळाला आहे. योजनेअंतर्गत विहित नमुन्यात जिल्हानिहाय थकबाकीदार शेतकºयांची माहिती भरून घेण्यात आली. त्यानंतर वारंवार या योजनेच्या निकषात बदल करण्यात आले. पूर्वी कुटुंब गृहीत धरून जाहीर झालेल्या या योजनेची व्याप्ती वाढवण्यात आली.

त्याअंतर्गत व्यक्तिनिहाय कर्जमाफी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. अनेक कारणांनी हजारो शेतकरी कर्जमाफी योजनेपासून वंचित राहिले होते. आता शासनाच्या नव्या निर्णयामुळे यातील काही शेतकºयांना दिलासा मिळणार आहे.तालुकास्तरीय समितीकडून दुरुस्ती करुन आलेल्या याद्यांची पडताळणी करून राज्य पातळीवरील दहावी ग्रीन लिस्ट जाहीर करण्यात आली. त्यात जिल्ह्यातील जिल्हा बँकेशी संबंधित ३ हजार २३० शेतकºयांचा समावेश करण्यात आला आहे.

सात कोटी पाच लाख ७२ हजार रुपयांची एकूण कर्जमाफी या यादीत दर्शविली आहे. यातील ८३९ जणांना ३ कोटी १९ लाखाची कर्जमाफी, २ हजार ३९१ शेतकºयांना ३ कोटी ८५ लाख रुपयांचे प्रतिशेतकरी २५ हजाराचे अनुदान, तर दीड लाखापेक्षा जास्त कर्ज असलेल्या १८७ शेतकºयांना एकरकमी परतफेड योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे. त्यांनी १ कोटी ८० लाख रुपये भरल्यानंतर १ कोटी ८१ लाख रुपयांचा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यात सुमारे वीस हजार शेतकरी कर्जमाफी मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

जिल्ह्यातील १ लाख ८१ हजार शेतकºयांनी कर्जमाफीसाठी अर्ज भरला होता. आत्तापर्यंत १ लाख १७ हजार ८२१ शेतकºयांना २६६ कोटी ६८ लाख रुपयांची कर्जमाफी आणि प्रोत्साहन अनुदानासह ओटीएसचा लाभ मिळाला आहे.जिल्ह्यातील २८ हजार ३८२ शेतकºयांना १0५ कोटी १९ लाख रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे. ८६ हजार २६0 जणांना १३२ कोटी ७५ लाखाचे प्रोत्साहन अनुदान मिळाले आहे.आतापर्यंतची मिळालेली कर्जमाफी

  1. कर्जमाफीसाठी अर्ज : १ लाख ८१ हजार
  2. कर्जमाफीचे लाभार्थी : २८ हजार ३८२
  3. कर्जमाफीची रक्कम : १0५ कोटी
  4. ओटीएस लाभार्थी : ३,१७९
  5. प्रोत्साहन अनुदान लाभार्थी : ८६,२६0
  6. प्रोत्साहन अनुदान रक्कम : १३२ कोटी ७५ लाख
  7. ओटीएस लाभाची रक्कम : २८ कोटी ७४ लाख
टॅग्स :Farmerशेतकरीbankबँक