शिराळा : शिराळा तालुक्यात अतिवृष्टी, वारणा व मोरणा नदीस आलेल्या महापुरामुळे १०३ घरांची पडझड झाली आहे, तर २२ जनावरांचे गोठे पडले आहेत. घरांच्या पडझडीचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे.
शिराळ्यात ६ घरे व ३ गोठे पडले आहेत. अंत्री खुर्द ७ घरे, अंत्री बु. ३ घरे, ४ गोठे, कापरी २ घरे, पावलेवाडी ३ घरे, बेलेवाडी १ घर, रिळे २ घरे, धसवाडी ३ घरे, बिळाशी ९ घरे व ६ गोठे, कुसाईवाडी ६ घरे, खिरवडे ५ घरे, खुजगाव १ घर, मोरवाडी २ घरे, हातेगाव १ घर, बेरडेवाडी १० घरे, भाष्टेवाडी १० घरे, आरळा ९ घरे, सोनवडे १२ घरे, येसलेवाडी ११ घरे, काळूनद्रे व गुढे येथे जनावरांच्या एका गोठ्याची पडझड झाली आहे. शिराळा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे शेती व रस्ते वाहून मोठे नुकसान झाले आहे. पावसाने उघडीप दिली आहे. वारणा नदीस महापूर आला होता तो हळूहळू कमी होत आहे.