शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
2
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
3
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
4
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
5
व्हायरल होण्याचं भूत, मिठी मारुन कपलची कालव्यात उडी; Video पाहून वाढेल हृदयाची धडधड
6
"भावांनो, असं आयुष्य कोण जगेल..."; कौटुंबिक वादातून पतीनं संपवलं जीवन, मृत्यूपूर्वी दीड मिनिटांचा Video
7
खऱ्याखुऱ्या विराट कोहलीने पान टपरीवाल्याला केला कॉल, नंतर पोलीस त्याच्या घरी पोहचले अन्...
8
ट्रम्प यांच्या ५०% टॅरिफनं मुकेश अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर घसरला? ₹१७ वर आला भाव!
9
Janmashtami 2025: बाळाला कृष्णाचे नाव ठेवायचंय? ही घ्या १०८ नावांची यादी; अगदी मुलींचीह!
10
HDFC-ICICI बँकेच्या शेअर्समुळे बाजार गडगडला! पण, 'या' क्षेत्राने दिली साथ; कशात झाली वाढ?
11
माझा काही संबंध नाही, काँग्रेसने परवानगीशिवाय 'तो' व्हिडिओ वापरला; केके मेननचे स्पष्टीकरण
12
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
13
शाओमी YU7 च्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड, अवघ्या दोन मिनिटांत ३ लाख बुकींग!
14
१९ वर्षे असते शनि महादशा, ‘या’ राशींना मिळतो अपार पैसा, भाग्योदय; भरभराट, भरघोस लाभच लाभ!
15
धक्कादायक! लोकोपायलटच्या जाग्यावर तिसराच व्यक्ती बसला, मोठा गोंधळ उडाला, अनेकांचा जीव धोक्यात; व्हिडीओ व्हायरल
16
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; घोषणा करणाऱ्या खासदाराचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक!
17
प्रेमविवाहानंतर अवघ्या १० दिवसांत पत्नीचा काटा काढला; पोलीस शिपाई का बनला गुन्हेगार?
18
पैशांचा पाऊस! अदानींच्या संपत्तीत एका दिवसात ५० हजार कोटींची वाढ, टॉप-२० श्रीमंतांच्या यादीत पुन्हा स्थान!
19
Video: एकाच महिलेचं ६ वेळा मतदार यादीत नाव, EPIC क्रमांक वेगळे...; महाराष्ट्रातील प्रकार व्हायरल
20
एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक?

डिसेंबरपर्यंत १०० टक्के लसीकरण? चेष्टा करता की काय राव !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्ह्याला आठवडाभरात कशीबशी २०-२५ हजार लस मिळत आहे, या स्थितीत डिसेंबरपर्यंत १०० टक्के लसीकरणाच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : जिल्ह्याला आठवडाभरात कशीबशी २०-२५ हजार लस मिळत आहे, या स्थितीत डिसेंबरपर्यंत १०० टक्के लसीकरणाच्या केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या घोषणेने सांगलीकरांना जणू गुदगुल्याच झाल्या आहेत. लसीची वाट पाहून कंटाळलेल्या नागरिकांनी ही चेष्टा बरी नव्हे असाच सूर उमटवला आहे.

कोरोना घराघरात शिरण्याची भीती निर्माण झाली तेव्हा लसीकरणासाठी सर्व केंद्रांवर मरणाची गर्दी झाली. कोरोनाची लागण होईल ही भीती मागे ठेवून नागरिकांनी एकमेकांच्या अंगावर चढून लस मिळवण्याचा प्रयत्न केला, पण लस मिळालीच नाही. जिल्ह्यात २८ लाख लोकसंख्येला लस द्यावी लागणार आहे, पण गेल्या पाच महिन्यांत फक्त सात लाख लोकांनाच मिळाली आहे. लसीकरणाची गती अशीच राहिली तर प्रत्येकाला लसीचे दोन डोस मिळायला दोन वर्षेही पुरणार नाहीत.

पॉईंटर्स

आजपर्यंत झालेले लसीकरण

पहिला डोस दुसरा डोस एकही डोस न घेतलेले

आरोग्य कर्मचारी २७,३७३ १६,१८४ ८५१

फ्रंटलाइन वर्कर्स ३०,१५१ ११,१७९ ३५००

ज्येष्ठ नागरिक २,४८,४७६ ६०,८२६ ३,४०,०००

४५ ते ६० वर्षे वयोगट २,५२,४९० ३०,०४३ ११,६७,४६७

१८ ते ४४ वर्षे वयोगट १६,५२९ ००० १७,४४,००८

ग्राफ

लसीकरण प्रारंभ १६ जानेवारी

प्रत्येक आठवड्याला २०,०००

प्रत्येक महिन्याला ८०,०००

हिच गती राहिल्यास जून २०२३ पर्यंतही लसीकरण १०० टक्के पूर्ण होणार नाही.

बॉक्स

१८ वर्षांखालील लसीकरण म्हणजे स्वप्नरंजनच !

शेवटच्या टप्प्यात १८ वर्षांखालील लोकसंख्येच्या लसीकरणाचे शासनाचे नियोजन आहे. पण ते अद्याप कागदावरच आहे. या वयोगटात जिल्ह्यात पाच लाख लाभार्थी आहेत. त्यांच्यासाठी कोणती लस वापरणार?, किती डोस द्यावे लागतील? किती दिवसांच्या अंतराने द्यावे लागतील?, याचे कोणतेही नियोजन शासनाकडे नाही. १८ वर्षांवरील लोकसंख्येच्या लसीकरणाचा ताळमेळ अद्याप नसताना त्याखालील लाभार्थ्यांचे लसीकरण म्हणजे फक्त स्वप्नरंजनच ठरणार आहे.

बॉक्स

फक्त २० केंद्रांवर लसीकरण

जानेवारीत पाच केंद्रांवर लसीकरण सुरू झाले. पुरवठा वाढला तेव्हा केंद्रेही टप्प्याटप्प्याने वाढविण्यात आली. २६७ केंद्रांवर लसीकरण सुरू झाले. लसींचा तुटवडा होऊ लागला तेव्हा मात्र अनेक केंद्रे बंद पडली. कधीकधी फक्त २०, तर कधीकधी १० केंद्रांवरच लसीकरण सुरू असते. आठवड्यातून एकदा २० ते २५ हजार डोस येतात. दोनच दिवसांत संपूनही जातात. अशावेळी सर्व केंद्रांवरील लसीकरण थांबते.

कोट

किमान दोन लाख लसींचा पुरवठा करावा, अशी मागणी आम्ही वेळोवेळी केली आहे, पण पुरवठा अत्यंत कमी आहे. आठवड्याला २० ते ३० हजार डोस मिळतात. मागणी प्रचंड असल्याने दोन-तीन दिवसांतच लस संपते. पुरेसा पुरवठा झाला तर वेगाने लसीकरण करण्याची आमची तयारी आहे. सध्याची गती पाहता संपूर्ण जिल्ह्याचे लसीकरण कधी पूर्ण होईल याचा अंदाज करता येत नाही.

- डॉ. विवेक पाटील, लसीकरण अधिकारी