शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पेठ येथे दहा लाखांची शोभेची दारू जप्त

By admin | Updated: October 31, 2015 23:59 IST

गुन्हा दाखल : स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई

सांगली : पेठ (ता. वाळवा) येथील कोळेकर गल्लीतील सुरेश तुकाराम पेठकर याच्या जुन्या घरावर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने शुक्रवारी रात्री छापा टाकून सुमारे दहा लाखांचा शोभेच्या दारूचा साठा जप्त केला. पेठकर याने विनापरवाना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शोभेच्या दारूचा साठा करून त्याची विक्री करण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्याविरुद्ध इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शोभेच्या दारूचा स्फोट होऊन अनेकांचा बळी गेल्याच्या घटना कवठेएकंद (ता. तासगाव) येथे घडल्या आहेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अनेक विक्रेते विनापरवाना फटाक्यांचा साठा करून त्याची विक्री करीत असल्याची माहिती जिल्हा पोलीसप्रमुख सुनील फुलारी यांना मिळाली होती. त्यामुळे फुलारी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणला कारवाईचे आदेश दिले होते. पेठ येथील सुरेश पेठकर याने कोणताही परवाना न घेता मोठ्या प्रमाणात शोभेच्या दारूचा साठा केला असल्याची माहिती मिळाली. पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट, सहायक निरीक्षक अमितकुमार पाटील यांच्या पथकाने शुक्रवारी रात्री दहा वाजता कोळेकरच्या जुन्या घरावर छापा टाकला. या छाप्यात दहा लाखांचा शोभेच्या दारूचा साठा आढळून आला. हा साठा जप्त करण्याची कारवाई शनिवारी पहाटे तीन वाजेपर्यंत सुरू होती. पेठकर याच्याविरुद्ध इस्लामपूर पोलिसांत गुन्हा दाखल करून पथक दुपारी सांगलीत दाखल झाले. जप्त केलेला साठा इस्लामपूर पोलिसांच्या ताब्यात दिला आहे. तसेच पुढील तपास त्यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. पेठेकर हा मोठा विक्रेता असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. या कारवाईत सहायक फौजदार शरद कुरळपकर, राजू कदम, हवालदार अशोक जाधव, राजू कोळी, राजू नलवडे, संदीप मोरे, मेघराज रूपनर, अमित परीट, शशिकांत जाधव, विकास भोसले व किशोर काबुगडे यांनी सहभाग घेतला. (प्रतिनिधी)