शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

बायको तुमच्यावर सतत भडकतेय? सतत फुगून बसतेय? -मग तुम्ही या 5 चूका तर करत नाही.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 16:38 IST

नवरा आपल्याला टाळतोय, त्याचं आपल्याकडे लक्ष नाही असं बायकोला वाटतं कारण पुरुष हमखास या 5 चूका करतात.

ठळक मुद्देलग्न नावाच्या नात्यात एकमेकांना वेळ देणं जितकं गरजेचं तितकंच लहानसहान गोष्टींकडे लक्ष ठेवणंही. ते चुकलं तर संसाराचा तोल आणि ताल चुकायला लागतो.

अनेकदा नवर्‍याला वाटतं की आपण इतकं चांगलं वागतो, इतके पैसे कमावून आणतो. बायको जे जे मागेल ते ते देतो. तिला काही कमी पडू देत नाही. संसाराच्या गरजा भागवतो, त्यासाठी मरमर राबतो तरी हिचं तोंड वाकडंच. कायम पापड मोडलेला. सतत चिडचिड. टोमणे मारणं. हिला काय कमी पडतं हेच कळत नाही. सतत भांडणं उकरून काढते. ती असं का वागत असेल? याचा जर नीट अभ्यास केला तर ढोबळमानानं काही कारणं सापडतात. ही कारणं म्हणजे हमखास नवरा बायकोच्या भांडणाचं मूळ. बाकी व्यक्तिगत कारणं तर असतातच. पण ही कारणं अशी आहेत की, बायकोला वाटतं नवर्‍याचं आपल्याकडे दुर्लक्ष होतं. त्याचं आपल्याकडे लक्ष नाही. तो आपल्याला भाव देत नाही. आणि आपण नवर्‍यासाठी काहीच महत्वाच्या नाही. असं वाटतं म्हणून ती कटकटत राहते. कधी उघड नाराजी व्यक्त करते कधी हुप्प फुगा होते. तर तो ता फुगा का होतो याची ही 5 कारणं. पुरुष या चूका करतात आणि म्हणून बायकोचा फुगा होतो. 

1) काही कॉम्प्लिमेण्ट देत नाही.अनेक पुरुष बायकोला चुकून कधी कॉम्प्लिमेण्ट देत नाही. म्हणजे कुठं बाहेर जायचं असो, तिनं नवीन ड्रेस घातलेला असो, नवीन दागिना, हेअरस्टाईल, पर्स हे सारं ते नोटीस करत नाहीत. विचारलं कसं दिसतं तरी बरंय यापलिकडे काही बोलत नाहीत. किंवा फार काही भारी नाही म्हणत टवाळी करतात.आणि बायको भडकते.

2) बायकोचा फोटोअलिकडे ऑफिसात डेस्कवर फॅमिली फोटो ठेवतात. पाकिटात ठेवतात. घरात फ्रेम करुन ठेवतात. मोबाइल स्क्रीन सेव्हर. फेसबूक प्रोफाइल, कुठंही बायकोचा चेहरा दिसत नाही. चुकून कधी बायकोचा फोटो पोस्ट केला जात नाही. मग बायकोला वाटतं की आपण याला आवडत नाही, याचं आपल्याकडे लक्ष नाही.

3) कहीं पे निगाहेबाहेर जेवायला, फिरायला गेलं तरी लक्ष दुसर्‍या बाईकडे. किंवा मोबाईलवर मैत्रिणीशी बोलणं, बायको चिडणार नाही तर काय?

4) गिफ्ट कधी दिलं?अनेक नवरे वर्षानुर्वे बायकोला गिफ्ट देत नाही. शेवटचं कधी गिफ्ट दिलं त्यांना आठवत नाही. वाढदिवसालाही तुला आवडेल ते घेवून ये असंच सांगतात. त्यानं बायकोचा मूड जातो.

5) सतत फोनमध्ये लक्षबायको बोलतेय, पण आपलं लक्ष सतत फोनमध्ये. फोनवर गेम खेळताय नाही तर व्हॉट्सअ‍ॅप. बायकोचा भडका उडतो तो इथेच.