Shocking : लाल ड्रेसच्या मुलीला पाहून मुलांचा बदलतो मूड, जाणून घ्या रहस्य !
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2017 16:02 IST
एका नव्या संशोधनात लाल रंगाचा ड्रेस परिधान केलेल्या मुलींकडे मुले जास्त आकर्षित होतात असे आढळून आले आहे. चला जाणून घेऊया या मागचे रहस्य.
Shocking : लाल ड्रेसच्या मुलीला पाहून मुलांचा बदलतो मूड, जाणून घ्या रहस्य !
लाल रंगाला प्रेमाचे प्रतिक समजले जाते. म्हणूनच बॉयफ्रेंड आपल्या गर्लफ्रेंडला लाल गुलाबाचे फुल देऊन इंप्रेस करीत असतो. शिवाय चित्रपटात नायिकेचा लूक आकर्षक दिसण्यासाठीदेखील लाल ड्रेसचा वापर करण्यात येतो. मात्र आपणास माहित नसेल लाल रंगा मागे मुलींपेक्षा मुलांची आवड जास्त लपलेली असते. विशेषत: मुलांना लाल रंग जास्त आवडत असतो. एका नव्या संशोधनात लाल रंगाचा ड्रेस परिधान केलेल्या मुलींकडे मुले जास्त आकर्षित होतात असे आढळून आले आहे. चला जाणून घेऊया या मागचे रहस्य. लाल रंगात आकर्षक करण्याचा गुणधर्म असल्याने त्यावरुन दृष्टि सहजासहजी दूर होत नाही. अशातच जर एखादी मुलगी लाल रंगांचा ड्रेस परिधान करुन समोर आली तर साहजिकच मुलांची दृष्टि त्यावर नक्की पडते. लाल रंग संताप, धोका आणि भूकचेही प्रतिक समजले जाते त्यामुळे साहजिकच हार्मोन्समध्ये बदल होणे शक्य आहे. अशावेळी जर लाल रंगाचा ड्रेस परिधान केलेल्या एखाद्या मुलीवर मुलाची दृष्टि पडली तर त्वरित त्याच्या मूडमध्ये बदल होऊ शकतो. शरीरात हार्माेन्स बॅलन्स बिघडल्याने मूड स्विंग होतो. अशावेळी संतापात असलेला मुलगाही शांत होऊ शकतो. विशेषत: लाल रंग रोमान्स आणि आनंदाचाही संकेत आहे. त्यामुळेच चित्रपटात रोमॅँटिक गाण्यात नायिकेला लाल रंगाचे कपडे परिधान केले जातात. लाल रंग ऊर्जेचाही संकेत आहे. त्यामुळे आपल्यामध्ये सकारात्मता निर्माण होेण्यास मदत होते. शरीरात ऊर्जा निर्माण झाल्याने आपल्या सभोवतालच्या सर्व वस्तू चांगल्या वाटू लागतात. अशावेळी लाल ड्रेसच्या मुली मुलांचे ह्रदय आणि मनावर ऊर्जा निर्माण करतात आणि आकर्षणाचा केंद्रबिंदू बनतात.