Relationship : पार्टनरच्या ‘या’ गोष्टी आपणास माहित असाव्याच !
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2017 14:23 IST
पार्टनरकडून अशा बऱ्याच गोष्टी लपवल्या जातात आणि याचा परिणाम नात्यात दूरावा निर्माण होतो.
Relationship : पार्टनरच्या ‘या’ गोष्टी आपणास माहित असाव्याच !
-Ravindra Moreबॉलिवूड असो की हॉलिवूड, मोजकेच असे कपल्स आहेत ज्यांचे रिलेशन लॉँग टाइम टिकले असतील. हा सर्व बदलत्या जीवनशैलीचा परिणाम दिसून येत असून याचा अप्रत्यक्ष परिणाम सामान्यांच्या जीवनावरही होत आहे. एक पार्टनर दुसऱ्याकडून नेहमी अपेक्षा करतो की, त्याला त्याच्या बाबतीत सर्वकाही गोष्टी माहित असाव्यात ज्या त्याच्या आयुष्यात घडत असतात. मात्र लग्नाला बरीच वर्ष होऊनही एका पार्टनरकडून अशा बऱ्याच गोष्टी लपवल्या जातात आणि याचा परिणाम नात्यात दूरावा निर्माण होतो. बऱ्याचदा याच कारणाने घटस्पोटदेखील होतो. आपल्याही बाबतीत असे काही घडत असेल तर वेळीच सावध व्हायला हवे. आपल्या पार्टनरच्या बाबतीत अशा काही गोष्टी असतात, ज्या आपणास माहित असाव्याच. आम्ही आपणास काही टिप्स देत असून त्या फॉलो केल्यास आपले नाते नुसते मजबूतच होणार नाही तर ते नाते नव्या उच्च स्तरापर्यंत जाऊ शकते. * आवडप्रत्येकाची आवड-निवड वेगळी असते. आवडीच्या कोणत्याही वस्तू मिळाल्यास आपणास मनसोक्त आनंद होत असतो. आपल्या पार्टनरच्याही काही आवडी-निवडी असतील. त्या जाणून घेतल्यास आणि त्यानुसार आपण वागलो तर हे आपल्या नात्यासाठी खूपच उत्तम ठरु शकते. यामुळे आपले नाते खूपच मजबूत होऊ शकते. * मित्र प्रत्येकाला एका चांगल्या मित्राची गरज असतेच. विशेष म्हणजे त्याचा सल्ला आपल्यासाठी खूपच महत्त्वाचा असतो. कदाचित आपणा व्यतिरिक्त आपल्या पार्टनरचाही असा एक मित्र असू शकतो. तो त्याचा नेहमी सल्ला घेत असेल. त्याच्याशी त्याला गप्पा करण्यात चांगला आनंद मिळत असेल. ते जाणून आपणही आपल्या पार्टनरचा चांगला मित्र बनण्याचा प्रयत्न करावा.* स्वप्नआपण आपल्या पार्टनरला कधी त्याच्या स्वप्नांच्या बाबतीत विचारले आहे. त्याचे भावनात्मक जग, आर्थिक सफलता, रचनात्मक व्यवसाय तसेच बाहेर फिरणे आदी त्याचेही काही स्वप्न त्याने उराशी बाळगले असतील. त्याचे हे स्वप्न आपण किती जाणून आहोत, हा प्रश्न स्वत:ला विचारावा. जर आपणास त्याच्या स्वप्नांच्या बाबतीत काहीच माहित नसेल तर आपल्या नात्यात दूरावा निर्माण होऊ शकतो. * भूतकाळप्रत्येकाच्या आयुष्याचा चांगला-वाईट भूतकाळ असतो. मात्र बरेचजण त्या भूतकाळातून नकारात्मक गोष्टीच घेतात आणि त्यामुळे नात्यात कटूता निर्माण होते. त्याऐवजी भूतकाळ विसरुन आज आहे त्या परिस्थितीत आपल्या पार्टनरचा स्वीकार करावा आणि आयुष्य चांगले जगावे. Also Read : INTERESTING : गर्लफ्रेंडच्या नाराजीचे ही आहेत कारणे, जाणून घेतल्यास होईल फायदा ! Relation : 'या' कारणाने अति प्रेमही ठरु शकते नात्यासाठी घातक !