शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
3
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
4
अलास्कामध्ये ट्रम्प-पुतिन भेटीनंतर एका अमेरिकन नागरिकाला मिळाले १९ लाखांचे गिफ्ट; नेमकं प्रकरण काय?
5
Nashik Crime: 'तुझ्या आईने आपले लग्न जमवलंय'; भोंदूबाबाने अल्पवयीन मुलीवर घरातच सुरू केले...
6
"जन्मदात्यांना नकोशी होती, गर्भातच मारण्याचा प्रयत्न", भारती सिंगची हृदय पिळवटून टाकणारी गोष्ट
7
“बेस्ट निवडणूक बॅलेट पेपरवर, तरी ठाकरे ब्रँडचा बॅन्ड वाजला, मुंबईकरांनी…”; कुणी केली टीका?
8
Airtel चा ग्राहकांना धक्का! सर्वात स्वस्त प्लान बंद, आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार
9
IT सेक्टर धोक्यात; ८० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले, नवीन भरतीही कमी झाले; कारण...
10
Donald Trump Tariff On India: ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
11
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
12
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
13
मुंबई महापालिकेची रंगीत तालीम! ठाकरे ब्रँडची ‘बेस्ट’ युती; ‘असा’ फिरला गेम, नेमके काय घडलं?
14
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
15
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
16
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
17
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
18
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
19
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
20
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!

Relation : ​आपला पार्टनर दूर जाऊ नये म्हणून...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2017 15:25 IST

जसजसे दिवस वाढत जातात तसे नात्यातील दूरावा वाढत जातो. आपल्या नात्यातही असे घडू नये म्हणून काही गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्यायला हवे...

-रवींद्र मोरे नात्याची सुरुवात ही गोड आणि आकर्षक पद्धतीने होत असते. सुरुवातीचे काही दिवस नात्यातील गोडवा टिकून राहतो, मात्र जसजसे दिवस वाढत जातात तसे नात्यातील दूरावा वाढत जातो. काही काळाच्या सहवासानंतर जोडीदाराचे अनेक दोष लक्षात यायला लागतात आणि आपला पार्टनर आपणास नकोसा वाटू लागतो. अगदी लहान-लहान गोष्टींमुळे वाद निर्माण होऊन ते इतके विकोपाला जातात की त्याचा शेवट नाते तुटण्यात होतो.  आपल्या नात्यातही असे घडू नये म्हणून काही गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्यायला हवे...* संवाद वाढवा बऱ्यादचा मुली काही गोष्टी मनातल्या मनात ठेवतात, म्हणजे बोलून दाखवत नाहीत. यामुळे त्यांच्या मनात काय सुरू आहे, ते कळत नाही. त्यामुळे वाद अधिक विकोपाला जातात आणि नात्यात दूरावा येतो. असे होऊ नये म्हणून एकमेकांमधील संवाद वाढविणे आवश्यक आहे. संवाद वाढल्याने एकमेकांच्या मनात काय ते कळेल आणि वाद संपुष्टात येईल. * इतरांशी तुलना नको आपल्या जोडीदाराच्या काही निगेटिव्ह गोष्टी माहित झाल्यानंतर बऱ्याच मुली त्याच्या समोर इतरांशी जवळीक साधायचा प्रयत्न करुन त्याची तुलना करतात. मुलींची ही सवय मुलांना मुळीच आवडत नाही. त्यामुळे नात्यात दुरावा होणे साहजिकच आहे. असे न करता त्याचे दोष एकांतात त्याच्या लक्षात आणून द्या. असे केल्याने त्याच्या मनात तुमच्याविषयी आदर वाढेल आणि नाते टिकून राहील. * विनाकारणची भांडणे टाळा  बऱ्याचदा मुली अगदी शुल्लक कारणांनी आपल्या पार्टनरशी भांडतात. सततच्या भांडणांमुळे मुले कंटाळतात. त्यांचा नात्यातील रस कमी होतो आणि नात्यात दूरावा निर्माण होतो. विनाकारणची भांडणे टाळल्यास नात्यात प्रेम टिकून राहते. * जोडीदाराला दुर्लक्ष करणे टाळा  आपला जोडीदार आपल्याशी गप्पा मारतोय, चर्चा करतोय हे समजूनही बऱ्याच मुली आपल्या जोडीदाराकडे मुद्दाम दुर्लक्ष करतात. त्याच्या कोणत्याही गोष्टींमध्ये रस नाही असे दर्शवितात. अशामुळे नात्यात ताण निर्माण होतो आणि नाते तुटू शकते. असे होऊ नये म्हणून तो काय सांगतोय याकडे लक्ष द्या आणि त्याला समजून घ्या. * वेळोवेळी काळजी घ्या ज्याप्रमाणे तो तुमची छोट्या-छोट्या गोष्टीत काळजी घेतो, त्याप्रमाणे तुम्हीही त्याच्याकडे लक्ष द्यावे अशी त्याची माफक अपेक्षा असते. परंतु तुम्ही जर स्वत:च्याच विश्वात गुंग असाल व त्याच्याकडे तुमचे दुर्लक्ष होत असेल तर नात्यात दुरावा येणे स्वाभाविक आहे.  Aslo Read : ​Relation : ​चुकूनही पार्टनरला ‘या’ शब्दांचा प्रयोग करु नका, अन्यथा...!                    : ​​Relationship : त्याचे मन जिंकण्यासाठी काय कराल?