Relation : जर कमी वयात झाले असेल आपले ‘लग्न’ तर ही बातमी नक्की वाचा !
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2017 12:33 IST
कमी वयात लग्न करण्याचे काही फायदेही आहेत आणि काही नुकसानही आहे, हे आपणास माहित आहे का? चला जाणून घेऊया...!
Relation : जर कमी वयात झाले असेल आपले ‘लग्न’ तर ही बातमी नक्की वाचा !
लग्न एक असे नाते आहे जे दोनच व्यक्तींना नव्हे तर दोन परिवारांना आपसात जोडते. या नव्या नात्यासोबत दोन्ही परिवारावर बऱ्याच जबाबदाऱ्याही येतात. मात्र आजदेखील बरेच मुले-मुली आहेत, ज्यांचे कमी वयातच लग्न केले जाते. कधी रुढी-परंपराच्या नावाने तर कधी कुटुंबातील मोठे-वृद्ध व्यक्तींची शेवटची इच्छा म्हणून लवकर लग्न लावले जातात. नुकतीच याच आशयाची ‘पहरेदार पिया की’ ही मालिका कथानकामुळे सुरुवातीपासूनच वादात अडकली आहे. यात एका १८ वर्षाच्या तरुणीचं ९ वर्षाच्या मुलासोबत लग्न होतं. नुकत्याच झालेल्या काही एपिसोडमध्ये सुहागरात तसंच कुंकू लावण्याचे सीन दाखवले होते. यावर प्रेक्षकांनी आक्षेप नोंदवला होता. त्यानंतर बीसीसीसीने संबंधीत वाहिनीला मालिकेची वेळ बदलण्याचा आदेश दिला होता. त्यामुळे मालिका रात्री ८.३० ऐवजी रात्री १०.३० वाजता प्रसारित होत होती. याशिवाय मालिका सुरु असताना ‘ही मालिका बालविवाहाला प्रोत्साहन देत नाही’, अशा आशयाची पट्टी चालवावी, असे निर्देशही देण्यात आले होते. मात्र आता ही मालिकाच बंद करण्यात आली आहे. कमी वयात लग्न करण्याचे काही फायदेही आहेत आणि काही नुकसानही आहे, हे आपणास माहित आहे का? चला जाणून घेऊया...! * कमी वयात लग्नाचे फायदेकमी वयात लग्न केल्यास मुलगा आणि मुलगी दोघेही एकमेकांसोबत जास्तीत जास्त वेळ व्यतीत करीत असल्याने दोघे एकमेकांना लवकर समजून घेतात. मुलगी लवकर आपल्या सासरवाडीत मिक्स होते. तेथील परंपरा, रितीरिवाज लवकर समजून घेते. त्यामुळे प्रेग्नन्सीसंबंधी समस्या कमी होण्यास मदत होते. * कमी वयात लग्नाचे नुकसानकमी वयात लग्न केल्यास दोघांवर वेळेअगोदरच परिवाराची जबाबदारी येते. तसेच दोघेही मॅच्युअर नसल्याने फॅमिली प्लॅनिंगवर लक्ष दिले जात नाही आणि कमी वयातच अजून एका सदस्याची जबाबदारी येते. कमी वयातच लग्न झाल्याने महिला सक्षम नसतानाही मुलांची सांभाळण्याची जबाबदारी येते. कमी वयात लग्न केल्याने सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोघांचे शिक्षण आणि करिअरवर परिणाम होतो त्यामुळे परिवारांच्या गरजा पुर्ण करण्यास अडचणी येतात आणि घरात वाद वाढून नात्यात तणावही निर्माण होतो.