शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

Relation : ​पार्टनरसोबत सार्वजनिक ठिकाणी फिरताना "हे" मुळीच करू नका !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2017 17:00 IST

काहीजण एवढे धुंद होतात की, सार्वजनिक ठिकाणी फिरताना सर्व भानच विसरतात.

आजची तरुणाई म्हणजे चित्रपटांचे प्रतिबिंबच समजावे. चित्रपटात अभिनेत्रीसोबत हातात हात घालून फिरणारा हिरो पाहिला की, इकडे आपल्या पार्टनरसोबत तशाच प्रकारे फिरण्यासाठी तरुणाई झाली सज्ज. पार्टनरसोबत फिरणे तसे अगदी आनंददायी गोष्ट असते. मात्र काहीजण तर चित्रपटांचे अनुकरण करुन एवढे धुंद होतात की, सार्वजनिक ठिकाणी फिरताना सर्व भानच विसरतात. सार्वजनिक ठिकाणी फिरताना काय काळजी घ्याल ?* बऱ्याचदा आपल्या प्रेमाची जाणीव होण्यासाठी आपण पार्टनरचा हातात हात धरतो, चुंबन घेण्याचा प्रयत्न करतो. मात्र या गोष्टी सार्वजनिक ठिकाणी करुन आपल्या प्रेमाचा दिखावा अजिबात करु नये. * काहीजण बाहेर फिरायला जात आहेत म्हणून मॅचिंग कपडे परिधान करतात. फॅशन शो किंवा स्पर्धेसाठी सारखे कपडे घालणे ठीक आहे. मात्र सार्वजनिक ठिकाणी एकसारखे कपडे घालणे विचित्र वाटते. * बरेचजण आपल्या व्यक्तिगत नात्याचे प्रदर्शन करतात. जोडीदार तुमच्या आयुष्यातील महत्वाचा भाग असला, तरी तुमचे स्वत:चे वेगळे अस्तित्व आहे.  प्रत्येक वेळी इतरांसोबत बोलताना आपल्या नात्याविषयी बोलणे टाळावे. * काहीजण तर बालिशपणाची हद्दच करतात. सार्वजनिक ठिकाणी आपल्या पार्टनरला लाडाच्या नावाने कधीही हाक मारु नका. आपणास जरी असे वागणे लडिवाळपणाचे वाटत असले, तरी इतरांना ते बालिशपणाचे वाटते. * बरेचजण अगदी लहान मुलांसारखे बोलण्याचा प्रयत्न करतात. मात्र सार्वजनिक ठिकाणी असे बोलणे अती केल्यासारखे वाटेल. * आपण जर गु्रपने कुठे फिरायला गेले असाल तर इतरांशी संवाद साधण्याऐवजी फक्त एकमेकांशीच गप्पा करण्यात गुंग राहू नका. तुमच्या अशा वागण्याने गु्रपमध्ये वेगळीच चर्चा सुरु होते.  * कोणीही माहिती विचारली नसताना, किंवा सांगण्याची गरज नसताना जर तुम्ही आपल्या खासगी आयुष्यविषयी सगळ्यांसमोर बोलत आहात तर ते मुळीच योग्य नाही.