Relation प्रत्येक महिला पुरुषांमध्ये शोधते हे ‘५’ गुण !
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2017 13:25 IST
महिलांनाही या गुणांचे पुरुष अधिक चांगले वाटतात. जाणून घेऊया पुरुषांमधले हे चांगले गुण जे अन्य पुरुषांनाही आत्मसात करायला हवेत.
Relation प्रत्येक महिला पुरुषांमध्ये शोधते हे ‘५’ गुण !
-रविन्द्र मोरे पुरुषांमध्ये बरेच चांगले गुण असतात ज्यामुळे ते इतरांपेक्षा वेगळे दिसतात. विशेष म्हणजे ते गुण ते स्वत: विकसित करीत असतात. त्यात दुसऱ्यांचा आदर करणे, प्रेमाने बोलणे आणि सत्याच्या बाजूने राहणे आदी असे बरेच गुण आहेत जे पुरूषांच्या व्यक्तिमत्त्वाला खुलवितात. महिलांनाही या गुणांचे पुरुष चांगले वाटतात. जाणून घेऊया पुरुषांमधले हे चांगले गुण जे अन्य पुरुषांनाही आत्मसात करायला हवेत. * महिलांचा आदर करणे चांगल्या पुरुषाची ओळख म्हणजे ते नेहमी महिलांचा आदर करतात. मग त्याची स्वत:ची पत्नी असो वा अन्य दुसरी महिला, तो प्रत्येक महिलेचा सन्मान करतो असे पुरुष महिलांना खूप आवडतात. * विचारपुर्वक काम करणे समजदार पुरुष प्रत्येक काम करण्याअगोदर विचारपुर्वक करतो, त्यामुळे तो आपल्या प्रत्येक कामात यशस्वी होतो. महिलांनाही असे पुरुष खूप आवडतात जे भावनेच्या भरात कोणताच निर्णय घेत नाहीत आणि परिस्थितीनुसार व्यवहार करतात. * आपल्या कुटुंबासाठी पुरेसा वेळ देणे कामानिमित्त बरेच लोक आपल्या कुटुंबासाठी वेळ देऊ शकत नाही मात्र एका चांगल्या पुरुषाची ओळख म्हणजे की तो नेहमी आपले कुटुंब, मित्र आणि नातेवाईकांसाठी वेळ काढतो. * सत्याची बाजू न सोडणेचांगला पुरुष कधीही चुकीच्या बाजूची साथ देत नाही, यासाठी त्याला आपल्यांच्या विरोधात जरी उभे राहावे लागले तरी चालेल पण तो कधीही आपला आत्मसन्मान गहाण ठेवत नाही. अशा पुरुषांचे महिलांच्या मनात वेगळेच स्थान निर्माण होते. * प्रामाणिकपणाएक चांगला पुरुष प्रामाणिकपणामुळेही ओळखला जातो. तो फक्त कामाच्या ठिकाणीच नव्हे तर परिवारातही अगदी प्रामाणिकपणे आपले नाते निभवित असतो. असे पुरुषही महिलांना खूप आवडतात. Also Read : Relation : लग्नानंतर महिलांना वाटते या ‘५’ गोष्टींची भीती ! : Relation : मुलांमधील या ‘५’ सवयींमुळे मुली पळतात दूर !