OMG : मुलांना अजिबात आवडत नाहीत ‘या’ प्रकारच्या मुली !
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2017 12:12 IST
आम्ही आपणास मुलींच्या त्या सवयींबाबत सांगणार आहोत ज्या मुलांना अजिबात आवडत नाहीत. जाणून घ्या...!
OMG : मुलांना अजिबात आवडत नाहीत ‘या’ प्रकारच्या मुली !
असे म्हणतात की, कोणतेही रिलेशन दोघांमध्ये असलेल्या समजुतदारपणामुळेच टिकत असते. बऱ्याचदा मात्र आपल्यात असे काही दोष असतात, ज्यामुळे आपला पार्टनर आपल्यापासून परावृत्त होतो. काही प्रमाणात हे दोष प्रत्येक्षात सांगितले जातात, मात्र बऱ्याचदा लपविलेही जातात, आणि नेमके याच कारणाने ब्रेक अप होतो. आज आम्ही आपणास मुलींच्या त्या सवयींबाबत सांगणार आहोत ज्या मुलांना अजिबात आवडत नाहीत. * चांगल्या नात्यातला गोडवा कमी करणारी गोष्ट संशय. मुलांना प्रत्येक गोष्टीत संशय व्यक्त करणाऱ्या मुली अजिबात आवडत नाहीत. याशिवाय थोडथोड्या गोष्टींवर अॅटिट्यूड दाखविणाऱ्या मुलींपासूनही मुले चार हात लांब राहणेच पसंत करतात. * रिलेशनमध्ये थोडीफार भांडण-तंटे सामान्य गोष्ट आहे. मात्र ही गोड भांडणे एका मर्यादेत राहिली तर ठिक आहे. बऱ्याच मुली अगदी शुल्लक गोष्टींवरदेखील खूप संताप व्यक्त करतात. हीच गोष्ट बऱ्याच मुलींना आवडत नाही. * बऱ्याच मुली मुलांचे स्वातंत्र्य अप्रत्यक्षपणे हिरावण्याचा प्रयत्न करतात. त्याचे मनमोकळे बोलणे, हसणे, गप्पा मारणे याच्यावर काही मुली बंधने लादण्याचा प्रयत्न करतात. त्यातच जर तो एखाद्या अन्य मुलीशी गप्पा मारत असेल तर ही गोष्ट तिला अजून जास्त खटकते आणि त्याच्याशी अबोला धरते. अशा मुलीही मुलांना आवडत नाहीत. * ज्या मुलींसाठी फक्त पैसा सर्वकाही आहे, अशा मुलींपासून मुले नेहमी दूर राहण्याचा प्रयत्न करतात. शिवाय प्रमाणापेक्षा जास्त परंपरांना मानणाऱ्या मुली देखील मुलांना बोर करतात. * बऱ्याच मुलींना मुलांसोबत फ्लर्ट करण्याची सवय असते. मात्र अशा मुलींना मुले अजिबात लाइफ पार्टनरच्या रुपात पाहत नाहीत. कोणत्याच मुलाची इच्छा नसते की, त्याच्या गर्लफ्रेंडने दुसऱ्या अन्य मुलासोबत फ्लर्ट करावे. Also Read : Relationship : चिपकू जोडीदाराला असे ठेवा दूर ! : Relation : मुलांच्या ‘या’ पाच सवयींपासून दूर पळतात मुली, आताच बदला !