OMG : ब्रेकअप झाल्यानंतर अशाप्रकारे दुसऱ्या मुलीला पटविण्याचा प्रयत्न करतात मुले !
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2017 15:51 IST
आपणास माहित आहे का ब्रेकअप झाल्यानंतर दुसऱ्या मुलीला पटविण्यासाठी मुले कसे-कसे प्रयत्न करतात? चला जाणून घेऊया.
OMG : ब्रेकअप झाल्यानंतर अशाप्रकारे दुसऱ्या मुलीला पटविण्याचा प्रयत्न करतात मुले !
सध्या ब्रेकअप होणे ही सामान्य बाब झाली आहे. विशेष म्हणजे नाते जोडण्यासाठी जेवढा आनंद होतो त्याही पेक्षा जास्त आनंद नाते तोडण्याच्या वेळेस होतो. बदलत्या जीवनशैलीनुसार सध्या कोण, केव्हा, कुठे कोणासोबत विश्वासघात करीत आहे याची काहीच शाश्वती नाही. तो काळ वेगळा होता, जेव्हा ब्रेकअप झाल्यानंतर मुलगा-मुलगी खाणे-पिणे सोडून रात्रंदिवस अश्रू गाळत बसायचे. आपण थोडा मुलांच्या बाबतीत विचार करुया. ब्रेकअप झाल्यानंतर मुले असे काही वागतात की, जणू त्यांच्यावर दु:खाचा डोंगरच कोसळला आहे. एखाद्या मुलीकडून प्रेमात धोका मिळाल्यानंतर मुलांना असे वाटते की, आता त्यांच्यासाठी या जगात कुणीच शिल्लक नाही. मात्र ही स्थिती फक्त जास्तीत जास्त दोन किंवा तीनच दिवस राहते आणि पुन्हा तो आपल्या जुन्या आयुष्यात जगू लागतो. आपणास माहित आहे का ब्रेकअप झाल्यानंतर दुसऱ्या मुलीला पटविण्यासाठी मुले कसे-कसे प्रयत्न करतात? चला जाणून घेऊया.मुले सर्वप्रथम सुरुवात अशा मुलीपासून करतात जी त्याची एक्स गर्लफ्रेंडची मैत्रीण असेल. तो तिला प्रेमपुर्वक मॅसेज करतो. अशावेळी समोरच्या मुलीला असे वाटते की, हा मुलगा आतादेखील त्याच्या एक्स गर्लफ्रेंडला विसरला नाही आणि बिचारा एवढा रोमॅँटिक आहे, तरीदेखील तिने त्याला सोडले. असे मॅसेज तो तिला वारंवार पाठवून तिचे मन जिंकण्याचा प्रयत्न करतो. समोरची मुलगीही त्याच्या या भावनाप्रधान आणि रोमॅँटिक मॅसेजला बळी पडते आणि त्याच्या जाळ्यात ओढली जाते. एक दिवस मग पुढाकार घेऊन ती स्वत: त्याला प्रपोज करते किंवा त्याने केलेल्या प्रपोजला होकार देते. मात्र ज्या मुलींशी ओळख नाही अशा मुलींना मुले नको ते अश्लील मॅसेज पाठवून ट्राय करतात. जर संबंधीत मुलीने उत्तर दिले तर ठिक नाहीतर आपल्या मित्रांवर मॅसेज पाठविण्याचा आरोप लावून स्वत: भोळेपणाचा आव आणतात.