शहरं
Join us  
Trending Stories
1
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
2
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
3
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
4
छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले 
5
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
6
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
7
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
8
धुळ्यात भरचौकात गोळीबार करत मुंबईतील ज्वेलर्सच्याय कर्मचाऱ्यांकडून लाखोंचे सोने लुटले
9
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
10
वाखारीत न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार;आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल
11
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)
12
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
13
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
14
Nala Sopara: नालासोपाऱ्यात १२व्या मजल्यावरून पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू!
15
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!
16
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा
17
VIDEO: कॉलर पकडली, डोक्यावर फाईट मारली.. भिवंडीत टेम्पोचालक व पोलिसांमध्ये तुंबळ हाणामारी
18
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
19
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
20
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक

Friendship Day 2018: मैत्रीतलं प्रेम अन् प्रेमातली मैत्री

By वैभव देसाई | Updated: August 5, 2018 07:06 IST

मैत्रीचं रुपांतर प्रेमात कधी झाले हे वृषाली आणि मनोजलाही समजलेच नाही.

मनोजला तशी गावची फार आवड होती. विद्यार्थी दशेपासूनच त्याला मे महिन्याच्या सुट्टीतून बाबा आवर्जून गावी घेऊन जात असे. गावातल्या मुलांसोबत क्रिकेट खेळणे, नदीत पोहायला जाणे या त्याच्या आवडत्या गोष्टी होत्या. गणपतीतूनही गावी जाणं होत असल्यानं निसर्गाशी त्याची चांगली गट्टी जमली होती. झाडांच्या हिरव्या गर्द झाडीतून वाट काढत नदी गाठण्याचा अनुभव मनोजसाठी अद्वितीय असे. कालांतरानं शिक्षणाच्या एक एक पाय-या चढत मनोज दहावीत पोहोचला. दहावीची परीक्षा झाल्यानंतर त्याला गावी जाण्याची फार इच्छा होती. परीक्षा संपल्यानंतरचा दोन महिन्यांचा कालावधी मुंबईतल्या घरी बसून कसा काढायचा हा त्याच्यापुढे प्रश्न होता. तसेच वडिलांना त्याच वेळी सुट्टी नसल्यानं त्याचा काहीसा हिरमोड झाला.तसं मनोजचं अधूनमधून मामाच्या गावीही जाणं व्हायचं. त्यावेळी मामानं नेमकं मनोजच्या आईला फोन करून मनोजला गावी पाठवण्याचा आग्रह केला. मामाचा आग्रह आई तरी कसा मोडू शकणार होती. आईनं मनोजला मामाच्या गावी पाठवण्याचा निर्णय घेतला. झालं मग ठरलं मनोजला मामाच्या गावी पाठवायचं. मनोजही फार खूश होता. मामाच्या गावीसुद्धा मोठाली नदी, डोंगर रांगांसह मामाची एकरांमध्ये शेती होती. आंबा आणि काजूच्या बागा होत्या. त्यामुळे मनोजनंही गावातल्या मुलांबरोबर बागांमध्ये जाऊन आंबे खाणे, नदीवर जाऊन मनसोक्त डुंबण्यासह डोंगर रांगामध्ये फिरण्याचे मनोमन प्लॅन बनवण्यास सुरुवात केली. अखेर मनोज गावी जाण्यासाठी गाडीत बसला आणि सकाळी तो मामाच्या गावात दाखल झाला. उतरल्या उतरल्या निसर्गाच्या त्या शुद्ध हवेनं मनोजची झोप कुठल्या कुठे पळाली. सामानाची बॅग घेऊन मनोजनं थेट मामाचं घर गाठलं. घरी पोहोचल्यानंतर मामीनं आंघोळ करून येण्यास सांगितले आणि त्याच्या पुढ्यात गरमागरम पिठलं भाकरी ठेवली. मनोजनं क्षणाचाही विलंब न करता त्यावर ताव मारला. त्यानंतर मनोजचं गावातल्या मुलांबरोबर हिंडणं सुरूच होतं.ब-याचदा मनोज वाडीतल्याच गणेश नावाच्या मित्रासोबत माधवाची वाडी(वरची वाडी)वर जात असे. खेडशी गावात तशा चार वाड्या होत्या. सर्वच वाड्यांमध्ये जवळपास ३ ते ४ किलोमीटरचं अंतर होते. खालच्या वाडीतून माधवाच्या वाडीत जायचं म्हटल्यास बरीच पायपीट करावी लागे. माधवाच्या वाडीत जाण्याचा हेतू म्हणजे तिथे पाटलाचं किराण्याचं दुकान होतं. त्या दुकानावर पॅप्सीपासून बरेच खाद्य पदार्थ मिळत होते. खरं तर मनोजसाठी माधवाच्या वाडीत जाण्याचा अनुभव हा जरा नवाच होता. परंतु गणेशचं माधवाच्या वाडीत कायम येणं-जाणं असायचं. कारण गणेशचा मामासुद्धा माधवाच्या वाडीत राहत होता. गणेशच्या आईचं त्याच्या वडिलांशी प्रेमसंबंधातून लग्न झालं होतं. त्यामुळे गणेशला माधवाच्या वाडीची वाट काही नवी नव्हती. एकदा गणेश आणि मनोज दोघेही वरच्या वाडीत गेले होते. त्यावेळी गणेशनं चल जरा मामाकडे जाऊन येऊ या, असा मनोजला आग्रह केला. परंतु मनोज त्यासाठी तयार नव्हता. अखेर गणेश त्याला जबरदस्तीनं तिकडे घेऊन गेला. मनोज तिकडे गेल्यानंतर त्याला खळ्यातच एक सुंदर मुलगी दिसली. मनोजला पाहून ती घरात गेली.गणेश आणि मनोज दोघेही घरात गेल्यानंतर गणेशच्या मामीनं दोघांसाठी चुलीवर चहा टाकला आणि वृषालीला दोघांना पाणी देण्यास सांगितलं. ग्लासातून पाणी घेऊन आलेली मुलगी दुसरी-तिसरी कोणी नसून ती मगाशी खळ्यात उभी असलेली सुंदर मुलगी होती. अर्थात तिचं नाव वृषाली आहे हे मनोजला आता समजलं. दोघांनीही एकमेकांकडे पाहिलं आणि स्मितहास्य केलं. गणेश मामीशी गप्पा गोष्टी करण्यात दंग झाला. मनोज आपला अवघडल्यासारखा एका ठिकाणी बसून राहिला. वृषालीही लांबून सगळं पाहत होती. त्यानंतर गणेशनं मनोजची मामा-मामीशी ओळख करून दिली. तसा मनोजचा मामा गावातील प्रतिष्ठित व्यक्ती होता. त्यामुळे त्याला सगळेच ओळखत होते. मग गणेश आणि मनोज माधवाच्या वाडीत गेल्यानंतर वरचेवर गणेशच्या मामाकडे ये-जा करत होते. गणेशच्या मामाला तशी एक मुलगा आणि एक मुलगी होती. मुलगी म्हणजे वृषालीच.मनोज आणि गणेशचं माधवाची वाडीवर जाणं-येणं होत असल्यानं वृषालीची आणि मनोजचीही चांगली मैत्री झाली. वय अल्लड असल्यानं मनोजही वृषालीची चेष्टा-मस्करी करत असे. वृषालीलाही मनोजनं केलेली मस्करी फार आवडे. मनोजनं नुकतीच १०वीची परीक्षा दिल्यामुळे त्या वयात प्रेम हे काय असतं हे त्याला ठाऊकच नव्हतं. परंतु जेव्हा मनोज मुंबईला आला तेव्हा त्याला वृषालीची आठवण सतावू लागली. वृषालीच्या मनातही तशाच काहीशा भावना होत्या. त्यामुळे वृषालीही गावातल्या एसटीडी बुथवरून कधी ना कधी मनोजला फोन करत असे. कॉलेजात मुलं-मुली कसं प्रेम करतात ते मनोजनं त्यावेळी जवळून पाहिलं. तेव्हा त्यालाही वृषालीशी असलेली मैत्री म्हणजेच प्रेम याची जाणीव झाली. मग एकदा वृषालीनं गावातल्या एसटीडी बुथवरून फोन केला असता, मनोजनं तिला प्रपोज केलं. वृषाली जणू काही या क्षणाची वाटच पाहत होती. परंतु तिने मनोजला त्यावेळी काहीच उत्तर न देता फोन ठेवला. पुन्हा आठवड्यानं तिने मनोजला फोन केला. त्यावेळी पुन्हा मनोजनं तिला विचारला केली. तेव्हा तिनं फोनवरून लाजत हो म्हटलं. या मैत्रीचं रुपांतर प्रेमात कधी झाले हे वृषाली आणि मनोजलाही समजलेच नाही. असं म्हणतात, खरं प्रेम त्यागात दडलेलं असतं. काही अपरिहार्य कारणास्तव कालांतरानं त्यांचं हे नातं संपुष्टात आलं. परंतु त्याच्यातील मैत्री कधीच संपली नाही.(ही कथा काल्पनिक असून, त्याचा वास्तवाशी काही संबंध आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा)

टॅग्स :relationshipरिलेशनशिपFriendship Dayफ्रेण्डशीप डे