शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

​बेस्ट फ्रेंडस् फॉरेव्हर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2016 05:01 IST

गेली चार वर्षे तो  पेंग्विन याओला भेटण्यासाठी न चुकता येतो.

प्राण्यांपेक्षा आपला मेंदू जरी मोठा असला तरी कृतज्ञता, उपकाराची जाण आणि मान ठेवण्याची वृत्ती मानवांपेक्षा नक्कीच जास्त असते.आता ज्या पेंग्विनबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत त्यावरून तुमचा यावर विश्वास आणखी दृढ होईल.याओ परेएरा डीसूझा हा ब्राझीलमधील एक सामान्य कोळी. २०११ साली त्याला एके दिवशी किनाऱ्यावर जखमी पेंग्विन आढळला. तेलाने संपूर्ण माखलेल्या पेंग्विनला तसेच मृत्यूच्या दारात सोडून देण्याऐवजी त्याने त्यालासोबत नेले आणि मनोभावे त्याची काळजी घेतली.याओने त्याचे नाव ‘डिनडिम’ ठेवले. जेव्हा डिनडिम पूर्णपणे बरा झाला तेव्हा त्याची याओशी छान गट्टी जमली. परत जाण्याऐवजी तो अकरा महिने याओसोबत राहिला.याओ म्हणतो, ‘सुरूवातील तो जाण्यास तयार नव्हता. परंतु एकेदिवशी तो निघून गेला. तो सोडून गेला याचे मला खूप दु:ख झाले. पण विश्वास वाटत होता की तो, कधी तरी परत येईल. माझे मित्र म्हणायचे अरे तो प्राणी आहे, तो नाही येणार परत.’पण डिनडिम याओला विसरला नव्हता. काळी महिन्यांनी तो परत आला. गेली चार वर्षे तो याओला भेटण्यासाठी न चुकता येतो. याओ सांगतो, ‘त्याला पुन्हा पाहून मला विश्वासच बसला नाही. दरवर्षी तो जून महिन्यात येतो आणि फेब्रुवारी महिन्यात परत जातो. प्रत्येक भेटीमध्ये तो अधिकच प्रेमळ आणि मैत्रीपूर्ण होतोय. मला पाहून तो खूशदेखील दिसतो. डिनडिम माझ्या मुलासारखा, नव्हे...तो तर माझा मुलगाच आहे.’ अशी मैत्रीपाहून चांगुलपणावर विश्वास वाढेल.