शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुक युजर्स हमखास करतात या ५ स्टुपिड चुका

By admin | Updated: May 20, 2017 15:37 IST

आपल्याही नकळत आपण फेसबुकवर कोणत्या चुका करतो?

-ज्योती सरदेसाईआपण भले वापरतो फेसबुक दणक्यात. पडीक असतो तिथं. लोक आपल्या फोटोंना लाइक करतात, कमेण्ट्स करतात. त्या कौतुकाची चटकही लागते. पण त्या साऱ्या भावनेच्या भरात आपण काही चुका हमखास करतो. त्या टाळल्या नाहीतर तर आॅनलाइन डेटा चोरी आणि प्रायव्हसी हॅकच्या काळात आपल्यावर मोठी आफत येवू शकते.त्यामुळे चेक करा, तुम्ही या चुका करता आहात का?

१) पूर्ण जन्मतारीख टाकलीये?तपासून पहा, तुम्ही तुमची पूर्ण जन्मतारीख फेसबुकवर टाकली आहे का? असेल तर ती काढा. नुस्ती तारीख म्हणजे १ मे,२७ जून असं टाकलेलं चालेल. पण पुर्ण जन्मतारीख काढून टाका. कारण त्या जन्मतारखेच्या आधारे तुमची माहिती कुणीही मिळवू शकतं.२) करण्ट लोकेशन, कशाला?काहींना भारी हौस, आपण आत्ता कुठं आहोत ते अपडेट करण्याची. इटिंग अमूकतमूक अ‍ॅट ढमूकफमूक. कशाला? त्यानं आपण कुठं जातो, काय खातो, घरी कधी नसतो याची एक आॅनलाइन हिस्ट्रीच तयार होते. कशाला ठेवायच्या या पाऊलखूणा?३) मुलांचे/ मित्रांच्या मुलांचे/भाच्यांचे फोटो टाकताय?टाकले असतील तर ते आधी काढून टाका. एकतर असे फोटो टाकणं घातक, कुणीही ते पाहू शकतं, डाऊनलोड करु शकतं, त्याचा गैरवापर करू शकतं. त्यामुळे ते काढा. मुळात त्या लहान मुलांच्या प्रायव्हसीवर तो घाला आहेच, पण त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनंही ते घातक आहे.

 

४) फोन नंबर/मोबाईल नंबर/घराचा पूर्ण पत्ता?-डिलीट करा.आपल्या घरचा पूर्ण पत्ता, लॅण्डलाइन नंबर, आपला मोबाइल नंबर कधीही टाइमलाइनवर टाकायचा नाही. कुणी मागितलाच तर इनबॉक्समध्ये द्या. पण टाइमलाइनवर टाकू नये. मुलींनी तर अधिक काळजी घ्यावी.५) कुठल्या प्रोजेक्टवर काम करतोय?तुमचा बॉस खूप चांगला असेल, त्यानं तुम्हाला एखादा भारी प्रोजेक्ट करायला दिला असेल. तरी ते काम पूर्ण होइपर्यंत तरी त्याची माहिती फेसबुकवर टाकू नये. गरज नसेल तर कधीच टाकू नये. आपलं काम ही खासगी गोष्ट आहे. त्यात काही फार मोठा विक्रम केला तरच त्याची माहिती द्यावी, अन्यथा नाही.