शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेच्या १५ जणांची चौकशी

By admin | Updated: August 14, 2014 00:06 IST

पेपरफुटी प्रकरणातील दोघांचा समावेश

रत्नागिरी : सेवेत गैरप्रकार केलेल्या अकरा कर्मचारी व अधिकाऱ्यांची कोकण विभागीय सहायक आयुक्तांकडून आज, बुधवारी जिल्हा परिषदेत विभागीय चौकशी करण्यात आली. त्यात जिल्हा परिषदेच्या गाजलेल्या पेपरफुटी प्रकरणातील राहुल पांडे व जयराम बिराजदार यांचाही समावेश होता.जिल्हा परिषद परिचरपदाच्या परीक्षेत भ्रष्टाचार झाल्याचे उघडकीस आले होते. याप्रकरणी शहर पोलिसांनी शहरातील एका लॉजवर पेपरफुटी प्रकरणात आरोपींना रोख रकमेसह अटक केली होती. या प्रकरणातील संशयित आरोपी परिचर जयराम बिराजदार आणि विस्तार अधिकारी (सांख्यिकी) राहुल पांडे यांनाही पोलिसांनी अटक केली होती. मात्र, अद्याप यातील प्रमुख आरोपी कोण, हे स्पष्ट झालेले नाही. त्याची आज सहायक आयुक्त (चौकशी) यांनी म्हणणे नोंदवून घेतले.पेपरफुटीखेरीज विविध गैरप्रकारांचा आरोप असलेल्या १३ अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही आज नोटीस बजावली होती. पद्माकर कुळकर्णी (कुष्ठतंत्रज्ञ), निजामुद्दीन मुर्तुझा पिरजादे (मिश्रक), हेमंत विभिषण दराडे (कनिष्ठ सहायक), चंद्रकांत वारघडे, भगीरथ नलावडे (दोन्ही तत्कालीन ग्रामसेवक), मारुती सूर्यवंशी, तेजश्री सुरेश खटावकर (दोन्ही ग्रामसेवक), चंद्रकांत पुजारी, अरविंद नागवेकर, जयसिंग कांबळे (दोन्ही तत्कालीन ग्रामविकास अधिकारी), राजेंद्र फणसे (कृषी अधिकारी) आणि संजय जानवलकर (विस्तार अधिकारी, कृषी) यांचा समावेश होता. (शहर वार्ताहर)