शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेवर आता प्रभारींचे ‘राज’

By admin | Updated: September 11, 2016 23:19 IST

अनेकांच्या बदल्या : रिक्त पदांचा चढता आलेख...

रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांची अन्य जिल्ह्यांमध्ये बदली झाली असून, जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांचीही बदली झाली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेतील रिक्त पदांचा आलेख हा वाढताच आहे. ग्रामीण पाणीपुरवठा व चिपळूण बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंत्यांच्या रिक्त पदांवर प्रभारीच कामकाज पाहत आहेत. प्रशासनातील या रिक्त पदांमुळे कामकाजावर परिणाम होत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. एकाच अधिकाऱ्याकडे अन्य विभागाचा चार्ज देऊन कामाचा बोजा वाढविण्याची पध्दत आता जुनी राहिलेली नाही. जिल्हा परिषदेत रिक्त होणाऱ्या पदावर शासनाकडून नवीन नियुक्ती कधी होईल, याचा नेम नसतो. त्यामुळे एकदा का एखादे पद रिक्त झाले की, सहा महिने, वर्ष, दीड वर्ष भरले जात नाही. त्यामुळे हे पदही अद्याप रिक्तच आहे. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आनंद पुसावळे यांची पुणे येथे बदली झाली असून, मुख्य लेखा व वित्त अधिकारी साळोखे यांची बदली रायगड जिल्हा परिषदेमध्ये महिनाभरापूर्वीच झाली आहे. मात्र, त्यांना दोन दिवसांपूर्वीच त्यांच्या बदलीच्या ठिकाणी सोडण्यात आले तर डॉ. पुसावळे यांना तत्काळ कार्यमुक्त करण्यात आले. तसेच दोन महिन्यांपूर्वी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुभाष म्हस्के यांची सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत बदली झाली आहे. मात्र, त्यांच्या जागी नवीन अधिकारी रुजू झाल्याशिवाय त्यांना बदलीच्या ठिकाणी सोडण्यात येऊ नये, अशी भूमिका जिल्हा परिषदेने घेतली आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागामध्येही कार्यकारी अभियंता पदावर वर्षभरापेक्षा जास्तकाळ उपअभियंता एस. बी. जंगम हे प्रभारी म्हणून कामकाज पाहात आहेत. बांधकाम विभाग, चिपळूणचे कार्यकारी अभियंता वन्नोरे याच कालावधीत रजेवर गेले. वन्नोरे हे गेल्याच आठवड्यात सेवानिवृत्त झाल्याने चिपळूण बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंतापदही रिक्त झाले आहे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग कार्यकारी अभियंता, चिपळूण बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता ही महत्त्वाची पदे रिक्त आहेत. ही रिक्त पदे शासन कधी भरणार, असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहे. (शहर वार्ताहर)