शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

जाकादेवी आठवडा बाजारात पिण्याच्या पाण्याची मागणी

By admin | Updated: December 16, 2014 00:17 IST

व्यापाऱ्यांचा मुद्दा : स्वच्छतागृहासाठीही धरला आग्रह

जाकादेवी : जाकादेवी येथील आठवडा बाजारातील व्यापाऱ्यांनी बाजाराच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी, अशी मागणी केली आहे.खालगाव - जाकादेवी (ता. रत्नागिरी) येथे खालगाव रोडजवळील तळ्याकाठी कातळावर दर बुधवारी आठवडा बाजार भरतो. सकाळी ८ ते सायंकाळी ६ ते ६.३० वाजेपर्यंत आठवडा बाजार सुरु असतो. जाकादेवी पंचक्रोशीतील ग्रामस्थ या बाजाराचा लाभ घेतात. भाजीपाला व इतर वस्तूंची विक्री करण्यासाठी येथे ठिकठिकाणाहून व्यापारी येत असतात. येथील व्यापारीही या बाजारात उत्साहाने भाग घेतात. कातळावर भरत असलेल्या या बाजारासाठी छत्र्या घेऊन किंवा काही सावली डोक्यावर घेऊन हे व्यापारी बसलेले असतात. अलिकडे उन्हाचा कडाका असतोच त्यामध्ये वातावरणात दमटपणा असतो. अशा उन्हाळी वातावरणात तहानही लागते. अलिकडे पिण्याच्या पाण्याच्या बॉटल्स बरोबर घेतल्या जातात. तरीही दुपारच्या जेवणाचा डबा खाताना पाणी अधिक प्रमाणात लागते. तिथे बॉटल्स अपुऱ्या पडतात व पाण्याची गरज वाढते म्हणून बाजाराच्या ठिकाणी हजार लीटर पाण्याची टाकी बाजाराचे दिवशी ठेवली तर पिण्याच्या पाण्याची अडचण दूर होईल . हा बाजार कातळावर अगदी उघड्यावर भरत असल्याने पाण्यावाचून ग्राहक व व्यापाऱ्यांची गैरसोय होत आहे. जवळपास झाडे - झुडपेही नसल्याने सावलीही मिळत नाही. या बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांची गर्दी होते. मात्र येथे स्वच्छतागृहाचा अभाव आहे. येथे महिलांचीही मोठ्या प्रमाणावर गैरसोय होते. त्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन बाजाराचे दिवशी स्वच्छतागृहाची सोय करावी अशी मागणी करण्यात येत आहे. तेथे आठवडा बाजारातील स्वच्छतागृहाची मागणी गेले काही दिवस होत असून खालगाव - जाकादेवी ग्रामपंचायतीने याकडे लक्ष द्यावी अशी मागणी केली जात आहे. आठवडा बाजार जेथे भरला जातो त्या ठिकाणी रस्त्यासमोर पाण्याचा छोटा तलाव आहे. मात्र, या तलावातील पाण्यात कपडे धुतले जातात . ते तळे स्वच्छ केलेले नाही त्यामुळे ते पिण्यास नाही. तेथे पिण्याच्या स्वच्छ पाण्याची व्यवस्था व्हावी, असे व्यापाऱ्यांनी सुचविले आहे. मात्र, तळ्याचा विकास व पाण्याची सुविधा हे दोन मुद्दे येथे महत्त्वाचे आहेत. (वार्ताहर)