शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
2
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
3
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
4
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
5
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
6
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
7
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
8
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
9
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
10
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
11
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
12
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
13
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
14
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
15
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
16
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
17
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
18
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
19
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
20
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात

आपले काम, आपली स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:33 IST

म्हणून आपण कसे बसावे, याची काही KINESIOLOGICAL तत्वे (हालचाली संबंधित) आणि ERGODYNAMICS (हालचालीयुक्त त्यातून निर्माण होणारी ऊर्जा) आहेत. ते ...

म्हणून आपण कसे बसावे, याची काही KINESIOLOGICAL तत्वे (हालचाली संबंधित) आणि ERGODYNAMICS (हालचालीयुक्त त्यातून निर्माण होणारी ऊर्जा) आहेत. ते आपण आता जपूया. १) पूर्वीच्या काळी ऑफीस खुर्च्या असायच्या. अगदी काटकोनात तशी घ्यावी. छानपैकी त्याला ‘सॉफ्ट’ नको पण एकदम ‘कडक’ही नको, अशी उशी घ्यावी. बसण्याच्या जागेवरही उशी अशीच असावी. जेणेकरुन आपले कुल्हे (BUTTOCKS) यांना थोडा नरम आधार मिळेल. त्याचीही बरीच कारणे आहेत. कडक उशीवर बसलं तर थोड्या वेळाने पायात मुंग्या यायला लागतात. निव्वळ स्नायू आणि मज्जातंतूवर येणारा दाब ही त्यापैकी एक कारणमिमांसा. २) मागच्या एका लेखात सांगितल्याप्रमाणे पायाखाली ‘फुटरेस्ट’ असावाच. जेणेकरुन गुडघे थोडेसे ‘हिप’ जॉईंटपेक्षा उंच राहतील. जेणेकरुन आपले कुल्हे, मांड्या, गुडघे आणि कंबरेचा सांधा यावर ताण पडणार नाही. ३) आता बघा, तुमची पाठ पूर्णपणे खुर्चीला टेकलेली आहे. (FIRMNESS) नकळत टेकते, कालांतराने सवय होऊन जाते. खड्ड्यांच्या रस्त्यातून आपल्या दुचाकी किंवा चारचाकीने कामाच्या ठिकाणी येताना प्रवासात आपल्या मानेपासून गुडघ्यापर्यंत जो थकव्यासह, नाराजीसह स्नायूंवर ताण आलेला असतो. तो एकदम हलका होतो, नाहीसा होतो. ‘RELAXATION’चा ‘WISDOM’ आपल्यात संचारतो. कामात आपण पूर्णपणे आनंदाने झोकून देतो. (अर्थात काहीवेळेस पर्यायही नसतो, पण तरीही आपण एक शांत स्थिती अनुभवतो. ४) आता आपल्या कामाचे टेबल, डेस्क किंवा संगणक टेबल, ते आपल्या जवळ असावे. त्यामुळे पुढे वाकावे लागणार नाही. ‘‘वाकून वाकून किती वाकावे! कंबरडेच मोडावे! त्यापेक्षा असे फर्म राहावे! जेणे साधियले, पाठीचे आरोग्य!’’ ५) संगणकीय साधने डोळ्याच्या लेव्हलवर असावी. त्यासाठी आपली ती साधने टेबलवर उंचवटा करुन किंवा टेबलची उंची वाढवूनही करता येईल. ज्याची-त्याची सोय त्यांनीच करावी. प्रशासन करेल याची वाट बघू नये. ६) खूप वेळ बसू नये. याचा उहापोह आपण केलाच आहे. काय करावे काय नाही, यावर आपण उपाय केले आहेत. (१९/०९/२०२१चा फिटनेस फंडा)

वाहन चालवताना चालक मग तो कार, मोटार, ट्रक, ट्रॅक्टर किंवा एस. टी.सारख्या ट्रॅव्हलर्स बसेस चालविणारे कुणीही असो, आपली ड्रायव्हींग सीट त्यांनी स्टिअरिंग व्हीलच्या जवळच घ्यावी. अर्जंट ब्रेक लावल्यावर कदाचित आपली त्या स्टिअरिंगवर छाती आदळू शकते, म्हणून कधीही ‘सीट बेल्ट’ वापरावाच. अपघात टळतात. व्यक्तिगत आपले अनेक फायदे होतात. विशेष म्हणजे मणके शाबूत राहतात. अरे हो! हे जरी हालचालीचे ‘आरोग्यमय गतीशास्त्र’ असले तरीही शासनाने त्यासाठी सीट बेल्ट न वापरल्यास ‘दंडाची’ ‘फाईन’ची व्यवस्था केली आहे. त्यापासून सुटका मिळेल. अजून एक खोट पण वाहनाच्या बेसला (पायाला) टेकते. त्याचा फायदा खूपच दूरचे ट्रॅव्हलिंग असले तर खोट दुखत नाही. म्हणून एक्सीलेटर आणि बेस यावर पाय पूर्णपणे टेकावा आणि खोटेचा भाग खालच्या बेसला टेकावा. माझ्या फिजिओ क्लिनिकमध्ये लाँग ड्रायव्हींग करणाऱ्या वाहनचालकांच्या तक्रारी या सीध्या साध्या दिसणाऱ्या तत्वानेच बऱ्या केल्या आहेत. त्यांना स्पष्टपणे सांगितलं आहे की, हे तत्व एकमेकांना सांगा, असे फायदे होतात.

अलीकडे प्रत्येक वाहनाला सिग्नल इंडिकेटर असतातच. म्हणून पर्याय नाही, हात बाहेर काढा, ही गरज संपलेली आहे. म्हणून ड्रायव्हींग शास्त्राप्रमाणे शक्यतो दोन्ही हात स्टियरिंग व्हीलवरच असावे. वाहनचालक हा नेहमीच ‘कम्फर्ट झोन’मध्ये असावा. त्याला पुरेशी विश्रांती सूज्ञ मालक देतातच. हा कम्फर्ट झोन आपल्या कुठल्याही कार्यालयीन आणि वर्किंग झोनमध्ये आवश्यक आहे, आपल्या सर्वांगीण आरोग्यासाठी...!

(क्रमश:)

- डॉ. दिलीप पाखरे, रत्नागिरी