शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

उगाच घाबरतो आपण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:29 IST

तो शास्त्रज्ञ त्याच्या कारने इकडे कोकणात आला. त्याने त्याचं नाव जाहिरातीत दिलंच होतं, निस्सीम पटवर्धन. त्याने... निस्सीमने त्या भूत ...

तो शास्त्रज्ञ त्याच्या कारने इकडे कोकणात आला. त्याने त्याचं नाव जाहिरातीत दिलंच होतं, निस्सीम पटवर्धन. त्याने... निस्सीमने त्या भूत बंगल्याची पाहणी केली. मूळ कागदपत्रं तपासले. तो जुना बंगला विकून देण्याची जबाबदारी फार पूर्वी तिथं राहणाऱ्या घरमालकाने माझ्यावर सोपवली होती. निस्सीमला रानात, अगदी शांत ठिकाणी असलेलं ते झपाटघर खूपच आवडलं. इतक्या मोठ्या, पण जुनाट घराचं खरेदीखत अवघ्या वीस लाखात केलं. वास्तविक ही तर ब्लाॅकची किंमत होती.

निस्सीमने महिनाभर तिथे मुक्कामच ठोकला. दापोलीतून माझ्या ओळखीचे कामगार नेऊन बंगला चकाचक केला, रंग काढला. त्याचं रूपच बदलून टाकलं. निस्सीम मुद्दाम त्या भूत बंगल्यात एकटा राहिला. व्यवहारातला एजंट म्हणून माझे पैसे, माझा हिस्सा मला मिळालाच.

मुख्य म्हणजे शास्त्रज्ञ निस्सीमला कसलाही त्रास झाला नाही. भास झाले नाहीत. कारण अशा गोष्टींवर त्याचा मुळी विश्वासच नव्हता. त्यामुळे तिथं सुरुवातीला एकटा राहूनही निस्सीम पटवर्धनला भयानक स्वप्ने वगैरे अजिबात पडली नाहीत. हवेत तरंगणारा दिवाही दिसला नाही. सध्या निस्सीम पुण्यात आहे. त्याने मला मित्रच मानलं आहे. त्या घराची एक चावी माझ्याकडे देऊन ठेवली आहे. अंधश्रद्धा निर्मूलन करणारी एक एकांकिका मी आणि माझा सहकारी शिर्के आम्ही बसवत आहोत. या नाटकाच्या तालमी आम्ही निस्सीमच्या त्या जंगलातल्या घरात घेतो. रात्री तालमी चालतात. पण मला आणि शिर्केला कधीही भुताटकीचा अनुभव आला नाही. सहकारी पियुष शिर्के मला विचारू लागला, ‘सर, तुमच्या या एकांकिकेला तुम्ही अजून नाव दिलेलं नाही. नाटक नीट बसवलं आपण... आणि त्याला अजून नाव नाही. स्पर्धेत उतरवताना अगदी ती ऑनलाईन असली तरी, टायटल हवंच.’ मी म्हटलं ‘पियुष’ नाटकाचं नाव ठरलं.

काय सर? उगाच घाबरतो आपण! शिर्केला ते शीर्षक खूपच आवडलं. मित्रांनो, आपण स्वत: एखादा अनुभव घेतल्याशिवाय कधीच विश्वास ठेवू नये. सांगोसांगी वडाला वांगी, असं नको. एकदा मनातली भीती काढून टाकली की, भूत बंगलासुद्धा राहण्याच्यादृष्टीने उत्तम बनतो... स्वस्तात मस्त! द्या टाळी.

- माधव गवाणकर, दापोली