शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांची सरकारमधून बाहेर पडण्याची तयारी?; 'वर्षा'वरील बैठकीत दादा संतापले, दानवेंचा दावा
2
डॉ. मुजम्मिलच्या डायरीतून समोर आलं मोठं गुपित, 'कोड वर्ड'मध्ये लिहिला होता दहशतीचा प्लॅन! आणखी 25 नावं समोर
3
पार्थ पवारांच्या कंपनीला सूट द्यायची आहे का? बावनकुळेंच्या प्रश्नामुळे मुद्रांक शुल्क विभागच संभ्रमात
4
CM देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकाच मंचावर येणार; दोघांची भेट लक्षवेधी ठरणार
5
तहसीलदार पदावरून ४ वेळा निलंबन; ‘कामाची’ सवय असलेले सूर्यकांत येवले लाच प्रकरणांतही आघाडीवर
6
दिल्लीत स्फोटापूर्वी मशिदीत गेला होता दहशतवादी डॉ. उमर नबी; स्फोटाच्या आधीचे सीसीटीव्ही समोर
7
अल-कायदाचा माजी कमांडर; व्हाईट हाऊसमध्ये अल-शरा आणि डोनाल्ड ट्रम्प यांची ऐतिहासिक भेट
8
“बूट फेकीसारख्या घटना पुन्हा घडू नये यासाठी काय उपाय करता येईल?”; सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
कर्तव्यनिष्ठेला सलाम! कुशीत बाळ अन् हातात मशीन... आई करतेय कंडक्टरचं काम; 'ती'चा संघर्ष
10
'या' सरकारी बँकेचा ग्राहकांना मोठा दिलासा; घर घेण्याच्या विचारात असाल तर, पाहा काय आहेत नवे दर?
11
Delhi Blast : व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूल! दिल्ली स्फोट प्रकरणात आणखी एका डॉक्टरला घेतलं ताब्यात
12
PAK vs SL: पाकिस्तानात स्फोट, श्रीलंकन क्रिकेटर मायदेशी परतण्याची भीती, PCBचा मोठा निर्णय
13
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटातील कारची ११ वर्षात ५ वेळा विक्री; खरा मालक कोण, शेवटचा व्यवहार कधी झाला?
14
नगरपरिषद निवडणुकीत नवी समीकरणे; बहुजन विकास आघाडी अन् मनसेची युती होणार? नेते म्हणाले...
15
Children's Day 2025: सुकन्या समृद्धी ते म्युच्युअल फंड SIP पर्यंत; बालदिनी तुमच्या मुलांना द्या खास आर्थिक गिफ्ट, जाणून घ्या स्कीम्स
16
बॉलिवूडच्या 'भट' कुटुंबात कटुता!, आलियाने सख्ख्या काकाला बोलवलं नाही लग्नाला अन् राहालाही नाही भेटवलं, मुकेश भट यांचा खुलासा
17
अंजली दमानियांकडून राजीनाम्याची मागणी; मला योग्य वाटेल ते मी करेन, अजित पवारांची प्रतिक्रिया
18
'अमेरिकन कामगारांना ट्रेन करा आणि घरी जा...' ट्रम्प प्रशासनाचं नवीन फर्मान; भारतीय IT अभियंते चिंतेत
19
"हिंदीतील लॉबीने मला स्वीकारलं नाही...", अजिंक्य देव स्पष्टच बोलले; अजय-सनीचं घेतलं नाव
20
डरानेवालो को डराओ! 'शिवतीर्थ'समोर बॅनरबाजी; उत्तर भारतीय सेनेने मनसे प्रमुख राज ठाकरेंना डिवचलं

होय! आम्ही मराठीचे पाईक आहोत...!

By admin | Updated: February 27, 2015 00:17 IST

थोडासा दिलासा : भाषा बदलत असली तरी तरूणाई म्हणते ‘मम्मी’पेक्षा ‘आई’च बरी!

मेहरून नाकाडे - रत्नागिरी  --मराठी भाषेला घरघर लागल्याची जोरदार ओरड होत असली तरीही ज्यांच्या हाती उद्याचं भविष्य आहे, ती तरूणाई मातृभाषेबाबत जागरूक असल्याचे दिसून आले आहे. एवढेच नव्हे तर इंग्लिश ‘मम्मी’पेक्षा मराठी ‘आई’च बरी, असेही तरूणाईचं मत आहे. लिखाणाची भाषा बदलली असली तरीही मातृभाषेबद्दल आम्हाला जिव्हाळा आहे आणि आत्मियता असल्याचे ही तरूणाई सांगते.मराठी राजभाषा दिनाच्या पूर्वसंध्येला ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणामध्ये ही बाब पुढे आली आहे. इंग्रजी माध्यमाच्या वाढत्या शाळा, ‘सोशल नेटवर्किंग साईटस्’वरील इंग्रजीचा बोलबोला यामध्ये मराठी कुठे हरवलेय? आणि ज्यांच्या हाती उद्याचं भविष्य आहे, त्या तरूणाईला याबाबत काय वाटतं? हे या सर्वेक्षणातून जाणून घेण्यात आले आणि इंग्रजीचा वापर करणारी मराठी तरूणाई मराठीबद्दल अजूनही आत्मियता बाळगणारी असल्याचेच दिसून आले. महाविद्यालयांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले आणि त्याला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मराठी भाषा आवडते का? मराठी बोलताना त्यामध्ये इंग्रजीचा वापर करणे योग्य आहे का? मराठी भाषेच्या प्रचारासाठी काय करणार? हे तरूणाईच्या मनातील जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्यामधून एक सकारात्मक चित्र पुढे आले आहे.मराठी मातृभाषा असल्याने भाषा बोलण्यास, लिहण्यास सोपी आहे, असे काही विद्यार्थ्यांना वाटत असले तरी ‘आणि’ शब्दाऐवजी अ‍ॅण्ड तोही शॉर्टकर्ट इंग्रजी लिपीतील (&) लिहिणे सोपे वाटू लागले आहे. इंग्रजीसाठी ‘शॉर्टकट’ खूप आहेत. त्यामुळेच इंग्रजी भाषा ही लिहिण्यात जास्त वापरली जाते, असे या तरूणाईचे म्हणणे आहे. महाविद्यालयीन मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांना मराठी भाषा आवडत असली, तरी इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांना ती अवघड वाटते. बोलायला सोपी असली तरी प्रत्यक्ष लिखाणात असंख्य चुका निदर्शनास येतात. याबाबत ‘लोकमत’च्या सर्वेक्षणात मराठी भाषा ९५ टक्के विद्यार्थ्यांना आवडत असल्याचे दिसून आले. मातृभाषा असल्याने मराठी आवडते, असे म्हणणाऱ्यांचे प्रमाण ८० टक्के आहे. विद्यार्थ्यांवर संगणक व मोबाईलचा पगडा सर्वाधिक असल्याने ‘शॉर्टकट’चा वापर करून संदेश पाठवण्याकडे तरूणाईचा कल जास्त आहे. एवढेच नव्हे तर हे आता रोजच्या लिखाणातही वाढू लागले आहे. माध्यमांच्या वापरामुळे तसेच चित्रपट, मालिकांमधील इंग्रजाळलेल्या संवादांमुळे चुकीचे मराठी कानावर आदळत असल्याने त्याचा वापर होतो. माध्यमांनी दिलेली भाषेची ‘देणगी’ स्वीकारतानाही तरूणाईला मातृभाषेबद्दल आपुलकी वाटते, हेही नसे थोडके!मराठीचा झोका उंच जावा!भाषेचा वापर वाढवला पाहिजे हे ९६ टक्के विद्यार्थ्यांनी सांगितले. व्याकरणाचा अभ्यास आवश्यक असणाऱ्यांची संख्या २० टक्के , मराठीतून बोलणारे ५५ टक्के, तर वाहिन्यांवर अधिकाधिक मराठी कार्यक्रम असावेत, असे ३५ टक्के विद्यार्थ्यांना वाटते. महाविद्यालयात मराठीचा वापर अधिकाधिक असावा असे वाटणारे २० टक्के आहेत. ई मिडियामध्ये मराठीचा वापर वाढला सांगणाऱ्यांची संख्या २० टक्के आहे.मोबाईल आणि संगणकीय भाषेत इंग्रजीच्या ‘शॉर्ट’ वापराचे प्रस्थ एवढे वाढले आहे की, आता विद्यार्थी त्याचा वापर अनावधानाने परीक्षेतही करू लागले आहेत. मराठी भाषेबद्दल आपुलकी असली, तरीही तरूणाईला सवयीच्या झालेल्या ‘ई-भाषे’चा पगडा आता जास्त जाणवू लागला आहे. असे प्राध्यापकांचे म्हणणे आहे.नाविन्य हवेच !आजची मराठी भाषा पूर्वीसारखी राहिलेली नाही. सोशल मीडियाचं, इंग्रजी भाषेचं तिच्यावर अतिक्रमण झालं आहे, हे विद्यार्थ्यांनी मान्य केलं आहे. मात्र बदल हे स्वीकारलेच पाहिजेत, त्यामुळे मातृभाषेबद्दलचा जिव्हाळा कमी होत नाही. आमची मातृभाषा मराठी असल्याचा आम्हाला अभिमान आहे, असे या रत्नागिरीतील विद्यार्थ्यांनी एकमुखाने सांगितले.