शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

५ वर्षात लखपतींचे कोट्यधीश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 23:02 IST

रत्नागिरी : रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीतील सर्वात श्रीमंत उमेदवार महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस निलेश राणे हे ठरले आहेत. ...

रत्नागिरी : रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीतील सर्वात श्रीमंत उमेदवार महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस निलेश राणे हे ठरले आहेत. निवडणूक अर्ज दाखल करताना केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपली जंगम आणि स्थावर मालमत्ता मिळून एकूण १९ कोटी रूपये एवढी मालमत्ता नमूद केली आहे.लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरताना उमेदवारांना आपल्या सर्व मालमत्तेसह व्यक्तिगत माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे निवडणूक आयोगाकडे सादर करावी लागते. २८ मार्च ते ४ एप्रिल ही अर्ज भरण्याची मुदत होती. या कालावधीत इतर उमेदवारांबरोबरच राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार नवीनचंद्र बांदोडकर, शिवसेनेचे विनायक राऊत आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे निलेश राणे यांनी अर्ज सादर केला आहे. यासोबत त्यांनी आपल्या मालमत्तेविषयीही माहिती सादर केली आहे.या तीन उमेदवारांच्या मालमत्तेची तुलना करता या तिघांमध्ये सर्वाधिक संपत्ती निलेश राणे यांची असून त्यांच्या नावे एकूण संपत्ती १९ कोटी नमूद करण्यात आली आहे.यापैकी जंगम मालमत्ता १२,४९,७५,२७७ इतकी तर स्थावर मालमत्ता ६,५४,७०,५०१ इतकी आहे. कर्ज ५,८६,०१,८६९ इतके नोंदविण्यात आले आहे. तसेच त्यांच्या नावे दोन मर्सिडिज आणि दोन टोयॅटा गाड्या आहेत. तसेच १६५६.१० ग्रॅम ( ५५,७२,७७७ रूपये) इतके सोने आहे. तर २०१४ सालची त्यांची संपत्ती ४४.८९ लाख इतकी नोंदविलीआहे.त्याखालोखाल विनायक राऊत यांची एकूण संपत्ती १३ कोटी १८ लाख नोंदविण्यात आली असून यापैकी जंगम मालमत्ता ३,८७,००,००० रूपये इतकी तर स्थावर मालमत्ता ३१,८७,२९८ रूपये इतकी आहे. कर्ज २८ लाख रूपये आहे. तसेच त्यांच्या नावे स्कॉपिओे ही एकच गाडी आहे. तसेच २२० ग्रॅम ( ६.५० लाख रूपये) इतके सोने आहे. त्यांची २०१४ सालची संपत्ती २.१६ लाख रूपये इतकी नोंदविली आहे.तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या नवीनचंद्र बांदिवडेकर यांची एकूण संपत्ती १ कोटी ८४ लाख नोंदविण्यात आली असून यापैकी जंगम मालमत्ता १,८३,९२,५०९ रूपये इतकी तर स्थावर मालमत्ता २,३३,०७८ रूपये इतकी आहे. कर्ज ५१,५६,४४८ रूपये आहे. तसेच त्यांच्या नावे टाटा सफारी, ह्युंडाई अशा एकूण दोन गाड्या आहेत.तसेच २५ ग्रॅम ( ५०,००० रूपये) एवढे सोने आहे. त्यांची २०१४ सालची संपत्ती ३० लाख रूपये इतकी नोंदविण्यात आली आहे. निवडणूक आयोगाकडे दिलेल्या शपथपत्रात नमूद करण्यात आले आहे.