शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पोफळीतील उपोषण लढ्याला यश

By admin | Updated: May 13, 2016 23:58 IST

सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या बैठकीत निर्णायक तोडगा

शिरगाव : कोयना प्रकल्पासाठी जमीन दिलेल्या प्रकल्पग्रस्त तरुणांची महानिर्मिती कंपनीत होणारी ससेहोलपट, वरिष्ठ व्यवस्थापकीय अधिकाऱ्यांकडून मिळणारी अन्यायकारक वागणूक याबाबत पोफळीतील कोयना संकूल प्रवेशद्वारासमोर केलेल्या उपोषण लढ्याला यश आले आहे. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात झालेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या बैठकीत व्यवस्थापकीय अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या चर्चेत निर्णायक तोडगा काढण्यात आला आहे. यावेळी मुख्य अभियंता वसंत खोकले, व्यवस्थापकीय संचालक बिपील श्रीमाळी, मनोज रानडे, भाजप पाटण तालुका उपाध्यक्ष नंदकुमार सुर्वे, नियोजन मंडळ सदस्य प्रताप शिंदे, राष्ट्रवादीचे सत्यजीत शेलार, रवींद्र शेलार, अनिल देसाई, बाळासाहेब शिंदे यांच्यासह दोन उपोषणकर्त्यांच्या बैठकीत चर्चा झाली. या अनुषंगाने कार्यमुक्त करण्यात आलेल्या २८ बीटीआरआय प्रशिक्षणार्थींना परीक्षा उत्तीर्ण झाल्यास कुशल कारागीर प्रशिक्षण योजनेत समाविष्ट केले जाईल. अनुत्तीर्ण झाल्यास मासिक ६ हजार वेतनावर पाचवेळा उत्तीर्ण होईपर्यंत परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे. दरम्यान, हे प्रशिक्षणार्थी काही अटींवर महानिर्मिती कंपनीत कार्यरत राहतील.आजअखेर ९६ प्रकल्पग्रस्त प्रशिक्षणार्थी १० हजारपर्यंत वेतन घेऊन महानिर्मितीच्या भरती प्रक्रियेची प्रतीक्षा करत आहेत. याबाबत शिष्टमंडळाने चर्चा करताच ऊर्जामंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. जाणीवपूर्वक अन्यायकारक वागणूक देणारे एस. एन. पोवार यांच्या चौकशीची मागणी नंदकुमार सुर्वे यांनी केली आहे. (वार्ताहर)‘लोकमत’ची कात्रण‘लोकमत’ने गेले तीन महिने सतत वस्तुनिष्ठ वृत्ताला प्रसिध्दी दिली. याबाबतची कात्रण एकत्र करुन बैठकीत ठेवण्यात आली. उपोषण कालावधीत दिलेल्या सहकार्याबाबत उपोषणकर्ते शैलेश शिंदे, कांबळे यांनी आभार मानले.